Share

महाराष्ट्राची परिस्थिती बनली बिकट, कोरोनाच्या रुग्ण संख्येत होतेय झपाट्याने वाढ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – देशातील काही राज्यांमध्ये नव्या कोविड रुग्णांच्या संख्येत प्रतिदिन मोठी वाढ होण्याचा कल कायम आहे. नव्या रुग्णांपैकी 80.63% रुग्ण महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक,गुजरात, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांतील आहेत.गेल्या 24 तासांत 39,726 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

देशभरात नव्या प्रतिदिन नोंदल्या गेलेल्या रुग्णांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 65% म्हणजे 25,833 रुग्ण आहेत. त्याखालोखाल पंजाब मध्ये 2,369 आणि केरळमध्ये 1899 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.देशातील आठ राज्यांमध्ये दैनंदिन पातळीवर नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड रुग्णांच्या संख्येचा आलेख सतत चढता राहिला आहे.

केंद्र सरकार सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश विशेषतः जिथे दैनंदिन रुग्ण संख्येत निरंतर वाढ निदर्शनाला येत आहे त्यांच्याशी सक्रीय समन्वय साधत आहे. केंद्र सरकार त्यांच्याबरोबर कोविड नियंत्रणाची स्थिती व सार्वजनिक आरोग्याच्या उपायांचा नियमितपणे आढावा घेत आहे.

महाराष्ट्र आणि पंजाब या राज्यांमध्ये अलीकडे वाढत असलेली कोविडच्या रुग्णाची संख्या लक्षात घेता कोविड-19 नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपायांना सहाय्य करण्यासाठी केंद्राने महाराष्ट्र व पंजाब येथे उच्चस्तरीय सार्वजनिक आरोग्य पथके नियुक्त केली आहेत. याआधी केंद्र सरकारने कोविड -19 विरुद्धच्या लढ्यात राज्यांना सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीर येथे उच्चस्तरीय पथके नियुक्ती केली होती. पुढील पाठपुरावा कारवाईसाठी केंद्रीय पथकांचे अहवाल राज्यांसमवेत सामायिक केले जातात.

आतापर्यंतच्या देशभरातील एकूण कोविड रुग्णांच्या संख्येच्या 2.82% म्हणजे 2.71लाख (2,71,282) सक्रीय कोविड रुग्ण सध्या देशात आहेत गेल्या 24 तासांत एकूण सक्रिय रुग्णांमधून 18,918 रुग्णांची नोंद झाली आहे.देशभरातील एकूण कोविड सक्रीय रुग्णांपैकी 76.48% रुग्ण महाराष्ट्र, केरळ आणि पंजाबमध्ये आहेत. आज सकाळी सात वाजेपर्यंत, 6,47,480 सत्रांच्या आयोजनातून सुमारे चार कोटी कोविड विरोधी लसीचे (3,93,39,817) डोस देण्यात आले आहेत.

यामध्ये 76,35,188 आरोग्य कर्मचारी (पहिला डोस), 47,15,173 आरोग्य कर्मचारी (दुसरा डोस), 78,33,278 पहिल्या फळीतील कर्मचारी (पहिला डोस), आणि 21,98,414 पहिल्या फळीतील कर्मचारी (दुसरा डोस) यांच्यासह 45 वर्षांपेक्षा अधिक वय आणि विशिष्ट सहव्याधी असणारे 27,79,998 लाभार्थी (पहिला डोस) आणि 60 वर्षांहून अधिक वय असणारे 1,41,77,766 लाभार्थी यांचा समावेश आहे.

भारतात आतापर्यंत एकूण कोविड मुक्त झालेल्यांची संख्या आज रोजी 1,10,83,679 आहे. राष्ट्रीय रोगमुक्तता दर 96.56% आहे. देशातील आंध्रप्रदेश, चंडीगड, ओदिशा, उत्तराखंड, झारखंड, लक्षद्वीप, सिक्कीम, मेघालय, दीव-दमण आणि दादरा-नगर हवेली, नागालँड, त्रिपुरा, लडाख (कें.प्र.) मणिपूर, मिझोरम, अंदमान निकोबार द्वीपसमूह आणि अरुणाचल प्रदेश या 16 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेल्या 24 तासांत एकाही कोविड रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!