पुणे : पुणे शहरात मे महिन्याच्या मध्यानंतर दुसऱ्या कोरोना लाटेतील रुग्णांच्या आकडेवारीत घसरण सुरु झाली. एप्रिल-मे महिन्यात दिवसाला ७-८ हजारांच्या घरात रुग्णांची संख्या गेलेली होती. ही रुग्णसंख्या आता शेकड्याच्या घरात आली असली तरी नव्या बाधितांची संख्या गेले काही दिवस वाढत आहे.
कोरोनामुक्ताच्या संख्येपेक्षाही नव्या कोरोना रुग्णांची संख्या हि अधिक असल्याने पुन्हा एकदा सक्रिय रुग्णांची संख्या हि ३ हजारांपार गेली आहे. आज (दि. १६ जुलै) रोजी पुणे शहरात तब्बल २८३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ८३ हजार १९९ इतकी झाली आहे. शहरातील २६८ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ७१ हजार ४७७ झाली आहे.
तर, पुणे शहरात सध्या ३ हजार ०४२ ऍक्टिव्ह (सक्रिय) रुग्ण आहेत. त्यापैकी २२९ रुग्ण गंभीर तर ४९८ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, कोरोना स्थिती पूर्ण आटोक्यात येण्यासाठी पुणेकरांनी बेफिकिरी न करता अधिक काळजी घेऊन नियमांचे पालन करण्याची गरज आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज ठाकरेंना झटका ; मनसेचे शॅडो कॅबिनेट मंत्री आदित्य शिरोडकरांनी केला शिवसेनेत प्रवेश
- ‘गो कोरोना गो’ नाऱ्यानंतरही कोरोना झाल्याचं म्हणत आता रामदास आठवलेंनी दिला नवा नारा
- हर्षवर्धन पाटलांना मोठा धक्का; अजितदादांच्या उपस्थितीत चुलत भावाचा राष्ट्रवादीत प्रवेश
- ‘पवार हे धोकेबाज नाहीत तर ते देशाचे नेते आहेत, राष्ट्रपती निवडणुकीसाठी त्यांना बळीचा बकरा करू नये’
- ‘सुशीलकुमार शिंदे सोलापूरचे राजकीय बाप!’, भाजपच्या सुभाष देशमुखांकडून स्तुतीसुमने
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

