Share

वाझेंचा देशपातळीवरील मोठा गुन्हा; एनआयएने आणखी १५ दिवसांची कोठडी मागितली

Published On: 

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. मागील सुनावणीमध्ये एनआयए कोर्टाने वाझेंना २५ मार्च पर्यंतची कोठडी सुनावली होती.

वाझेंची कोठडी आज संपत असल्याने एनआयएने न्यायालयाकडे आणखी १५ दिवसांच्या कोठडीची मागणी केली आहे. ‘वाझेंंचा गुन्हा हा देशपातळीवरील मोठा गुन्हा आहे. एखाद्या पोलिसाचा अश्या गुन्ह्यात सहभाग असणं ही शरमेची बाब आहे, असा युक्तिवाद करतानाच वाझेंची आणखी १५ दिवसांची कोठडी देण्याची मागणी एनआयए तर्फे एएसजी अनिल सिंह यांनी केली आहे.

दरम्यान, दिवसेंदिवस सबळ पुरावे समोर येत असल्याने वाझेंच्या अडचणीत वाढ होत असून दुसरीकडं राजकीय वातावरण देखील तापलं आहे. या प्रकरणाच्या सुरुवातीलाच भाजपने वाझेंना निलंबित करून त्यांची चौकशी करावी अशी मागणी केली होती.

यानंतर, केंद्रीय गृहविभागाने स्फोटक प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला होता. आता, मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास देखील एनआयएकडे सोपवण्यात आला असून एटीएसच्या हाती देखील मोठे धागेदोरे लागले आहेत. आता, ही केस व सर्व पुरावे एनआयएकडे सोपवण्यात यावा असं ठाणे सत्र न्यायालयाने आदेश दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!