Share

‘वैभव निंबाळकर यांच्या पायाला गोळी लागून जखमी झाल्याची बातमी वेदनादायी व अस्वस्थ करणारी आहे’

Published On: 

🕒 1 min read

गुवाहाटी – अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आसाम-मिझोराम सीमासंघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. दोन्ही राज्यातील वादग्रस्त सीमा ओलांडून आसाम पोलिसांनी मिझोराममधील कोलासिब येथील एका पोलीस चौकीचा ताबा घेतल्यानंतर तेथे हिंसाचाराला तोंड फुटले.

दरम्यान, सोमवारी उसळलेल्या रक्तरंजित संघर्षात पाच पोलीस अधिकारी सहा पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तब्बल सहा तास ही धुमश्चक्री सुरू होती.या हिंसाचारानंतर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांच्या पोलिसांवर आरोप केले आणि केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा अशी मागणी केली.

दरम्यान, आसामच्या पोलीस दलात कछार जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असणारे मराठमोळे अधिकारी वैभव निंबाळकर हे देखील यामध्ये जखमी झाले आहेत अशी माहिती समोर येत आहे. मिझोरममधील गटाकडून करण्यात आलेल्या गोळीबारात पोलीस अधीक्षक वैभव निंबाळकर यांच्या पायात गोळी लागली आहे. निंबाळकर यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत, अशी माहिती आहे.

निंबाळकर जखमी झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ट्वीट करून त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी प्रार्थना केली आहे. आपल्या ट्वीट मध्ये ते म्हणतात, आसाम मिझोराम सीमेवर झालेल्या चकमकीत इंदापूर सणसर गावचे सुपुत्र IPS वैभव निंबाळकर यांच्या पायाला गोळी लागून जखमी झाल्याची बातमी वेदनादायी व अस्वस्थ करणारी आहे. त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी कामना व्यक्त करतो. लवकर बरे व्हा! असे भरणे यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!