लातूर: मुरुडचे रहिवासी तथा शैक्षणिक, सहकार, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व सहकारमहर्षी आदरणीय शिवाजीराव (काकासाहेब) नाडे यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद व वेदनादायी आहे, आशा शब्दांमध्ये आ. पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी शिवाजीराव तुकाराम नाडे (वय ९६) यांचे शुक्रवारी (ता. ११) रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.
काकसाहेबांनी मुरुड गावचे सरपंचपद दीर्घकाळ सांभाळताना उस्मानाबाद जिल्हा बँकेचे चेअरमन, तेरणा साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन आदी जबाबदार्या यशस्वीपणे सांभाळत सहकार क्षेत्र समृद्ध केले. त्यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काकासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांना व आप्तेष्टांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळावे ही ईश्वराचरणी प्रार्थना, आशा शब्दांमध्ये आ. अभिमन्यू पवार यांनी त्यांच्या आठवणी व भावना व्यक्त केल्या.
काकसाहेबांनी हैदराबाद मुक्ती संग्रामात सशस्त्र सहभाग घेतला होता, त्याच सोबत त्यांनी १९५२ मध्य रूरल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. सहकारी संस्थांचे जाळे त्यांनी उभारले. जिल्हा मार्केटींग संस्थेचे ते अध्यक्ष होते. ढोकीच्या तेरणा साखर कारखाना, लातूरची जिल्हा बँकेची सातमजली इमारत व आशिया खंडातील सहकारी तत्त्वावरील डालडा फॅक्टरीच्या ( को – ऑपरेटिव्ह ऑईल इंडस्ट्रीज) स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. दूरसंचार, वीज, रेल्वे, वृक्ष लागवड, फेरभरण आदी क्षेत्रांत त्यांचे उल्लेखनीय काम आहे. तत्कालीन वीज मंडळाचे ते काही काळ सदस्य होते.
महत्वाच्या बातम्या
- केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार : अकाली दलाने सोडलेले मंत्रिपद महाराष्ट्रातील महिला खासदाराला मिळणार?
- कसोटीचे महाभारत! सहावा सामन्यात मंयकच्या द्विशतकाने बांग्लादेश चित
- सहा षटकार मारल्यानंतर अशी होती धोनीची प्रतिक्रिया ; युवराज सिंगने सांगितला किस्सा
- ‘सौ चुहे खा के बील्ली चली हज को’ गैरवर्तनानंतर शाकिबने मागितली माफी
- फ्रेंच ओपन: जोकोविचा अंतिम फेरीत प्रवेश, नदालचा पराभव करत परतफेड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
