🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेकडून औरंगाबादचा कायमच संभाजीनगर असा उल्लेख केला जातो. गेली कित्येक वर्षे औरंगाबादच संभाजीनगर नामकरण करण्यासाठी राजकारण सुरु असलेलं पाहायला मिळत आहे. नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचा दौरा केला. त्यांच्या दौऱ्याची माहिती देताना सीएमओच्या ट्वीटमध्ये संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला होता.
अशातच, औरंगाबादमध्ये ‘सुपर संभाजीनगर’ असा फलक शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांच्याशी संबंधित एनजीओने हा फलक लावला आहे. या फलकामुळे चर्चांना नामकरणाचा मुद्दा पुन्हा तापला आहे. औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेचीच सत्ता आहे. तर, याआधी खासदार देखील शिवसेनेचेचं होते. राज्याचे मुख्यमंत्रीपद देखील शिवसेनेकडे आहे. आता, शिवसेनेने यासंदर्भात हालचाली सुरु केल्याचं दिसून येत आहे. औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करावं यासाठी मंत्रालयात प्रस्ताव पाठवला आहे.
या संदर्भात काँग्रेसची असलेली भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केली आहे. काँग्रेसला नामकरण मान्य नसल्याचं ते म्हणाले आहेत. ‘या प्रस्तावाबद्दल मला माहिती नाही. महाविकास आघाडी ही विकासाच्या मुद्द्यावर करण्यात आली आहे. सामान्य माणसाला केंद्रीभूत करून सरावानं सोबत घ्यायचं, त्यांना सुखी करायचं हा आमचा किमान सामान कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.’ असं ते म्हणाले.
दरम्यान, औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्याला आमचा विरोध आहे , असे म्हटलेल्या बाळासाहेब थोरातांना भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी चे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांना जळजळीत प्रश्न केला आहे की ,काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांचे मूळ नाव काय आहे, हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. त्यांचे नामांतर तुम्हाला चालते पण औरंगाबाद चे संभाजीनगर का नाही ?स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी नामांतराचा उपयोग करण्याचे धंदे काँग्रेसने बंद करावेत. त्यांचा इटालियन अजेंडा महाराष्ट्रात चालणार नाही. औरंगाबादचे संभाजीनगर झालेच पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
लाचार झालेल्या शिवसेनेला , मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना आणि त्यांचे संपादक संजय राऊत यांना माझे आव्हान आहे की मर्दानगी ची पोकळ भाषा करण्यापेक्षा त्यांनी संभाजीनगर, धाराशिव असे नामांतर करुन खरी मर्दानगी दाखवावी असे म्हणत त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही डिवचले आहे.
महत्वाच्या बातम्या
- नववर्षाच्या सुरुवातीलाच जग कोरोनामुक्त होवो; सर्वांना मुक्तसंचाराचा आनंद लवकरच मिळो – अजित पवार
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, प्राचीन मंदिरांच्या संवर्धनाच्या कामाला वेग; समितीची स्थापना
- औरंगाबादमध्ये आता काँग्रेसचा महापौर बसवा; शिवसेनेच्या सत्तेला थोरातांचं थेट आव्हान
- पुणेकरांसाठी खुशखबर : PMPML च्या ताफ्यात दाखल होणार नव्या १५० ई-बसेस!
- शिवसेनेला मोठा धक्का; ‘या’ नेत्याने राज ठाकरेंच्या उपस्थित मनसेत केला प्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
