Share

‘न्यूझीलंडचा झेंडा फाडला असता पण …’; दौरा रद्द झाल्यानंतर पाकिस्तानी चाहता रडला, व्हिडिओ होतोय व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

इस्लामाबाद : एकदिवसीय मालिका सुरू होण्याच्या काही वेळापूर्वीच न्यूझीलंड क्रिकेट संघाने 17 सप्टेंबर रोजी दौरा रद्द केला. न्यूझीलंड सरकारकडून मिळालेल्या अलर्टनंतर टीमने हे पाऊल उचलले. यामुळे एकीकडे पाकिस्तानला खूप मोठा धक्का बसला तर दुसरीकडे चाहतेही खूप निराश आहेत.

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट चाहत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात तो स्पर्धा रद्द झाल्यानंतर रडताना दिसला. या चाहत्याने मुलाखतीदरम्यान न्यूझीलंडला फटकारले आहे. यावेळी हा क्रिकेट प्रेमी म्हणाला, ‘यापेक्षा आदरातिथ्याचा आणखी कोणता पुरावा…आम्ही पाकिस्तानचा झेंडा घातला आहे. न्यूझीलंडचा ध्वज घेतला आहे … जर त्याच्यावर पीसीबी आणि रमीज राजाचा लोगो नसता तर मी तो फाडून टाकला असता …’

ही व्यक्ती पुढे म्हणाली, ‘पाकिस्तानी क्रिकेट प्रेमींचा…इंशाअल्लाह मला आयसीसीवर पूर्ण विश्वास आहे की ते न्यूझीलंडवर बंदी घालतील…जर आयसीसीने यावर कारवाई केली नाही तर आम्हाला विश्वचषकावर बहिष्कार टाकावा लागेल…पाकिस्तान जगातील सर्वोत्तम संघ… पाकिस्तान जगाला सांगतो क्रिकेट काय आहे …’

https://twitter.com/shabeehspeaks/status/1438898914619494401?s=20

दौरा रद्द केल्यानंतर न्यूझीलंड क्रिकेटने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘न्यूझीलंड सरकारकडून पाकिस्तानमधील धोका पाहता आणि बोर्ड सुरक्षा सल्लागाराच्या सल्ल्यानंतर न्यूझीलंड संघाने न खेळण्याचा निर्णय घेतला.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) नवनियुक्त अध्यक्ष रमीज राजा यांनी न्यूझीलंड क्रिकेटला इशारा दिला आहे की, ते हा मुद्दा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) घेऊन जातील. तसेच रमीज यांनी ट्विट करून लिहिले, ‘हा एक विचित्र दिवस होता. आमच्या खेळाडूंना आणि चाहत्यांना वाईट वाटले. सुरक्षेच्या धोक्याबाबत एकतर्फी भूमिका घेत दौऱ्यातून माघार घेणे अत्यंत निराशाजनक आहे. न्यूझीलंड कोणत्या जगात राहतो? असं म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!