🕒 1 min read
मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते.’ या मालिकेतील प्रत्येक कलाकार कायमच चर्चेत असतात. या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणी गोखले प्रभुलकरने तर सर्वांच्या मनावर राज्य केले आहे. आता मालिकेतील अरुंधतीचा लूक बदलणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत स्वत: मधुराणीने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
मधुराणीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने डेनिम जॅकेट आणि जीन्स परिधान केली आहे. तसेच तिने केस देखील कापल्याचे दिसत आहे. तिचा हा लूक सध्या चर्चेत आहे. तसेच हा मालिकेतील अरुंधतीचा नवा लूक असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मधुराणीने तिचा हा फोटो शेअर करत ‘हा आहे अरुंधतीचा नवा लूक, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका’ असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे मालिकेत अरुंधतीचा लूक बदलणार या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
https://www.instagram.com/p/CVrzn_oKyxa/?utm_medium=copy_link
सध्या ‘आई कुठे काय करते’ मालिका एका वेगळ्या वळणावर असल्याचे पाहायला मिळते. अरुंधतीने तिच्या नावावर असलेले घर गहाण ठेवले आहे. तर अनिरुद्ध घर हे बिल्डरला देऊन फ्लॅटमध्ये राहायचे असे अप्पा आणि आईला सांगतो. त्यामुळे आता अरुंधती हे घर विकू देणार की नाही? असे एकंदरीत कथानक आहे. या मालिकेच्या माध्यमाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महागडे कपडे आणि वस्तूवरून केलेल्या आरोपांवर समीर वानखेडेंचे मलिकांना प्रत्युत्तर
- मोठी बातमी! एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर
- ‘असे साधुसंत येती घरा, तोची राष्ट्रवादीचा दिवाळी दसरा’; खोतांचा राष्ट्रवादीला टोला
- फटाके फोडा पण धूर काढू नका; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला
- वाचाळांना उत्तर देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही; फडणवीस-मलिकांचा वाद शिगेला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
