औरंगाबाद : लोकशाही शासन व्यवस्थेत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आर्थिक लाभ पोहोचले पाहिजेत. आपल्या देशात सामाजिक समन्यायाकरिता व आर्थिक सुबत्तेकरता अधिक प्रभावशाली जिल्हा नियोजनाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यापीठ अनुदान प्रायोजित (यूजीसी) ‘सेंटर विथ पोटेन्शियल फोर एक्सलन्सतर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन केले आहे. ‘डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग फॉर टॅपिंग डेव्हलपमेंट पोटेन्शियल’ या विषयावरील चर्चासत्राचे उद्घाटन नुकतेच केले. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थानी होते. उद्घाटन सत्रासाठी प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठातील प्रख्यात अर्थतज्ञ प्रा. ज. फा. पाटील उपस्थित होते. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या तीन विभागांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे. संयोजक डॉ. धनश्री महाजन, विभागप्रमुख डॉ शुजा शाकेर, डॉ. सुनील नरवडे, डॉ. स्मिता अवचार यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रख्यात अर्थतज्ञ तसेच राज्य व केंद्र पातळीवर नियोजनाच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष भाग घेतले. डॉ. ज. फा. पाटील यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये बलवंतराय मेहता समितीपासून जिल्हा नियोजनाच्या बाबतीतील संपूर्ण ऐतिहासिक आढावा समोर मांडला. तसेच जिल्हा नियोजनाचे विविध पैलू त्याचे महत्त्व आणि विविध राज्यांमधील त्याची अंमलबजावणी या बाबतीमध्ये स्वानुभवावर आधारित वस्तुस्थितीचे कथन केले. सामाजिक समन्यायाकरिता व आर्थिक सुबत्तेकरता जिल्हा नियोजनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- वाईट सुरुवातीनंतरही भारतीय संघ कसा उभारतोय मोठी धावसंख्या
- पांड्याला गोलंदाजी न देण्याचं कारण ऐकून सेहवाग कोहलीवर भडकला
- निष्काळजीपणा भोवणार ; महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर ?
- फुकटात मंत्रिपद मिळालंय, म्हणून आव्हाडांची वळवळ सुरु आहे – राणे
- शेतकऱ्यांची वीज तोडली;भाजपा आमदाराने वीज कंपनीच्या अभियंत्याला दोरीने बांधलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

