मुंबई:- मुंबईतील भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र, नगरसेवक नील सोमय्या यांना काल मुलुंड पोलीस स्थानकात चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. एका जुन्या खंडणीप्रकरणी नील सोमय्या यांना पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. तसेच मुलुंड पोलिसांकडून नील सोमय्या यांचा या गुन्हासंदर्भात जबाब नोंदवण्यात आला असल्याची माहिती, पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. जवळपास तीन तास त्यांची चौकशी करण्यात आली.
काल नील सोमय्यांची खंडणीच्या एका जुन्या प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी किरीट सोमय्यांना या प्रकरणी घेरलं असून आता सोमय्या गप्प का?, असा सवाल केला आहे.
किरीट सोमय्या यांच्या मुलाची खंडणीप्रकरणी चार तास कसून पोलिस चौकशी झाली आहे. यावर आता किरीट सोमय्या गप्प का?, असा त्यांनी केला आहे. तसंच, ज्याला कर नाही त्याला डर कशाची, असा प्रश्नही आमच्या मनात येतो. यासंबंधी किरीट सोमय्या यांनी त्यांच्या मुलाच्या संदर्भातील भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी तपासे यांनी केली आहे.
भाजपचे नेते @KiritSomaiya यांच्या मुलाची खंडणीप्रकरणात चार तास कसून पोलिस चौकशी झाली आहे. किरीट सोमय्या आता गप्प का, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. या प्रकरणात त्यांनी खुलासा केला पाहिजे.@BJP4Maharashtra@NCPspeaks pic.twitter.com/az59ZaORij
— महेश तपासे Maehesh Tapasey (@maheshtapase) January 31, 2021
महत्वाच्या बातम्या
- एक असाही छंद : बारवांचा शोध घेण्यासाठी रोहन फिरतोय रानोमाळ
- ग्राहक मंचाचा एसबीआयला दणका, रक्कम व्याजासह देण्याचे आदेश
- गांधी स्मृतिदिनी अमेरिकेत पुन्हा महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना…
- ‘ऊर्जा खात्याला तातडीने 10 हजार कोटी द्या नाही तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा’
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लवकरच अनावरण


