औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूरचे नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्या संकल्पनेतून शहरातील ऐतिहासिक निर्णयाची पूर्तता होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात महाराजांचा भव्य पुतळा उभा करावा, असा संकल्प नगरसेवक प्रदीप पाटील यांनी केला होता. याची पूर्तता होत असून खुलताबाद येथील शिल्पकार नरेंद्रसिंग साळुंके यांनी हा अश्वारूढ पुतळा बनवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची मिरवणूक लासुर नाका ते शिवाजी महाराज उद्यानपर्यंत वाजतगाजत काढून हा पुतळा बांधकाम करण्यात आलेल्या चौथऱ्यावर बसवण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षा वंदना प्रदीप पाटील, उपनागराध्यक्षा मंगल राजपूत, पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, नगरसेवक अविनाश पाटील, दीपक साळवे, नईम मंसुरी, मोहसीन चाऊस, नगरसेवक प्रदीप पाटील, मुकुंद जोशी सर्व धर्मीय तसेच मुस्लिम बांधवांनी छत्रपती शिवरायांचा जयघोष केला.
गंगापूर नगरपरिषद अस्तित्वात आल्यापासून शहरात विविध विकासकामे होत आहेत. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जिजामाता चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान आणि या पुतळ्याचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते लवकरच केले जाणार असल्याचे नगरसेवक प्रदीप पाटील यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- “अनुभवी रवींद्र जडेजा संघात नसणे, इंग्लंडसाठी दिलासादायक”, माजी क्रिकेटपटुचे वक्तव्य
- भज्जी चेन्नई संघातून मुक्त; पण ‘हे’ ३ संघ बोली लावण्यास उत्सुक
- तृणमूलच्या पाच नेत्यांचा भाजपात प्रवेश ! ममतांपुढे सत्ता राखण्याच आव्हान…
- बाबा हारले तरीही मुलगी आनंदी! डेविड वॉर्नर ची मुलगी विराटची जबरा फॅन
- ‘पेशवाई गेली, मात्र ब्राह्मण्यवाद गेला नाही; राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ब्राह्मण्यवादाचे नेतृत्व करतो.’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

