औरंगाबाद : महाराष्ट्र बारव मोहिमेंतर्गत मुंबईचा रोहन काळे मोटारसायकल वर प्रत्येक जिल्ह्यात रानोमाळ भटकंती करतोय. मुंबईच्या या अवलीयाने आतापर्यंत दुर्लक्षीत अशा ४०० बारवांचा शोधन घेतलाय. मराठवाड्यातील बारवांचा शोध घेत त्याने लोणगाव वाघ्रळला भेट दिली.
महेश्वर खंडवा – मलकापुर- जालना-पंढरपूर हा जुना पालखी मार्ग असून या मार्गावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक बारव बांधलेले आहेत. यातील अनेक बारवांचा वापर वारकरी वारीदरम्यान करीत असत. त्यापैकीच वाघ्रळ, इंदेवाडी अंबड येथील बारव आहेत. जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तुचा अभ्यास करणारे रामभाऊ लांडे आणि रोहन काळे यांनी अंबड व घनसावंगी तालुक्यातील वीस बारवांना प्रत्यक्ष भेटी देवून त्याच्या नोंदी केल्या. तिर्थपुरी येथील लक्ष्मीनारायण मंदिरातील बारव तिर्थपुरीकरांनी स्वच्छ ठेवल्याचे पाहून रोहन काळे यांनी आनंद व्यक्त केला.
राज्यातील एक हजार बारवांना भेटी देत त्याचे डाँक्युमेटेशन करण्यासाठी रोहन काळे यांनी कोकण, मुंबई, गोवा, पश्चिम महाराष्ट्र येथील बारवांना भेटी देवुन महाराष्ट्र बारव मोहीम अंतर्गत www.indianstepewlls वर रजिस्टर केल्या आहेत. वारसा संवर्धनासाठी लोकांनी आपले जलस्त्रोताचे जतन करावे यासाठी ही मोहीम सुरू केल्याचे रोहन काळे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- “अनुभवी रवींद्र जडेजा संघात नसणे, इंग्लंडसाठी दिलासादायक”, माजी क्रिकेटपटुचे वक्तव्य
- भज्जी चेन्नई संघातून मुक्त; पण ‘हे’ ३ संघ बोली लावण्यास उत्सुक
- तृणमूलच्या पाच नेत्यांचा भाजपात प्रवेश ! ममतांपुढे सत्ता राखण्याच आव्हान…
- बाबा हारले तरीही मुलगी आनंदी! डेविड वॉर्नर ची मुलगी विराटची जबरा फॅन
- ‘पेशवाई गेली, मात्र ब्राह्मण्यवाद गेला नाही; राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ब्राह्मण्यवादाचे नेतृत्व करतो.’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

