Share

ग्राहक मंचाचा एसबीआयला दणका, रक्कम व्याजासह देण्याचे आदेश

Published On: 

उस्मानाबाद : भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांना मनस्ताप देण्यासाठीच अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक केली की काय असे नेहमी वाटते. बँकेच्या कारभाराबाबत तर सर्वांनाचा माहिती आहे. असाच काहीसा प्रकार उस्मानाबाद येथे घडलाय. एका ग्राहकाच्या बँक खात्यातून 1 लाख 60 हजारांची रक्कम परस्परच विड्रॉल झाली. यावर बँकेने नेहमीप्रमाणे हात वर केले. पण ते ग्राहक महोदयांनी ग्राहक मंचात धाव घेतल्यावर त्यांना न्याय मिळालाय.

उस्मानाबाद तालुक्यातील पिंपरी येथील सौदागर माळी यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून परस्परच विड्रॉल झालेली १ लाख ६० हजार रुपयांची रक्कम खातेदारास व्याजासह परत करण्याबरोबरच यापोटी खर्चाची रक्कमही देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दिले आहेत.

माळी यांचे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील एसबीआय शाखेत बचत खाते आहे. या खात्यावरील व्यवहारासाठी त्यांच्या पासबूक व एटीएम कार्डही आहे. त्यांच्या या खात्यात १ लाख ८९ हजार ९९५ रुपये होते. परंतु, नोव्हेंबर २०१७ मध्ये सलग दोन दिवस त्यांच्या खात्यातून वेगवेगळ्या रक्कमेचे पैसे त्यांच्या परस्पर एटीएम तसेच ऑनलाईन पद्धतीने विड्रॉल करण्यात आले.

ही रक्कम १ लाख ६० हजार रुपयांची आहे. माळी यांनी एटीएम कार्डबाबत पूर्णता गुप्तता पाळलेली असतानाही बँकेच्या ई प्रणालीतील त्रुटीमुळे त्यांची रक्कम इतरांनी काढल्याची तक्रार त्यांनी बँकेकडे करत पैसे परत मिळण्याची मागणी केली. परंतु, बँकेने त्यांच्या तक्रारीला दाद न दिल्याने त्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात धाव घेतली.

यावेळी त्यांनी मांडलेले पुरावे ग्राह्य धरत मंचने बँकेस आदेश मिळाल्यापासून ४५ दिवसात सदरील एक लाख ६० हजार रुपयांची रक्कम दसादशे ६ टक्के व्याजदराने परत करावी, तसेच तक्रारदारास झालेल्या मानसिक व शाररीक त्रासाकरीता ५ हजार रुपये व तक्रार खर्चासाठी ३ हजार रुपये देण्याचे आदेश दिलेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!