Share

‘ऊर्जा खात्याला तातडीने 10 हजार कोटी द्या नाही तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा’

Published On: 

नागपूर:- फडणवीस सरकारच्या काळात आम्ही शेतकऱ्यांची वीज कापली नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनगटात ताकद होती. पाच वर्षे शेतकऱ्यांची वीज कापणार नाही, असं फडणवीसांनी ठामपणे सांगितलं होतं. पण या मुख्यमंत्र्यांच्या मनगटात तसं सांगण्याची ताकद नाही. त्यामुळे त्यांनी जमत नसेल तर राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेते आणि माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

ग्राहक आणि शेतकऱ्यांना वीज माफी देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने ऊर्जा खात्याला 10 हजार कोटी रुपये द्यावेत. त्यांना दिलासा द्यावा, अन्यथा जमत नसेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही बावनकुळे यांनी केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन वीज बिलाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 78 लाख वीज ग्राहकांना वीज कापण्याच्या या सरकारने नोटीसा पाठवल्या आहेत. या पूर्वी अशा घटना कधीच घडल्या नव्हत्या. त्यामुळे सरकारने ऊर्जा खात्याला तातडीने दहा हजार कोटी रुपये द्यावेत. ऊर्जा खात्याने ही रक्कम महावितरणला अनुदान म्हणून द्यावी. महावितरणने या रकमेतून आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना अनुदान देऊन त्यांना दिलासा द्यावा. त्यांची वीज बिलं रद्द करावीत, अशी मागणी बावनकुळे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!