Share

विधानसभा अध्यक्षपदासाठी कॉंग्रेसमधून ‘या’ नेत्यांची नावे आहेत चर्चेत

Published On: 

🕒 1 min read

 मुंबई : नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. नाना पटोले विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे राजीनामा सादर केल्यानंतर आता त्यांचीच वर्णी प्रदेशाध्यक्षपदी लागणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.औपचारिक घोषणा करण्यात आली नसली तरीही राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये नाना पटोले यांचेच नाव आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान,पटोले यांच्या राजीनाम्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष पदी कोण विराजमान होणार याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. यासाठी पृथ्वीराज चव्हाण, मराठवाडय़ातील काँग्रेस नेते आमदार सुरेश वरपुडकर, आमदार संग्राम थोपटे, आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्या नावांची चाचपणी सुरू आहे.

या पदासाठी चव्हाण आणि पाडवी यांच्या नावाची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे मात्र पाडवी यांना जर अध्यक्ष बनविण्यात आले तर त्यांचे आदिवासी विकास हे खाते नेमके कुणाकडे द्यायचे असा देखील प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. जर अशी परिस्थिती खरच निर्माण झाली आणि पर्याय उपलब्ध झाला नाही तर आमदार पृथ्वीराज चव्हाण, सुरेश वरपुडकर, संग्राम थोपटे या तिघांमध्ये एकाला विधानसभा अध्यक्ष होण्याची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चव्हाण यांच्या नावाची पक्षांतर्गत चर्चा सुरु आहे. चव्हाण यांचा प्रदीर्घ अनुभव, विधानसभेच्या कामकाजाची सखोल माहिती याशिवाय त्यांची स्वच्छ प्रतिमा हे सर्व लक्षात घेता त्यांच्याच गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडेल अशी शक्यता आहे.

पाथरीमधून निवडून आलेले सुरेश वरपूडकर हे देखील सध्या चर्चेत आहेत .काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून 1998 मध्ये कृषी राज्यमंत्री म्हणून काम केलं आहे. ते परभणी लोकसभा मतदारसंघामधून 98-99 मध्ये खासदारही होते.

अमीन पटेल यांनी हे मुंबईतील आमदार असून ही त्यांची तिसरी टर्म आहे . मुंबादेवी मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं आहे.यांच्या देखील नावाची सध्या चर्चा सुरु आहे.

आमदार संग्राम थोपटे यांचे देखील नाव माध्यमांमध्ये चर्चेत आहे. तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर देखील थोपटे यांना मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्त्यांनी पुण्यातील कॉंग्रेस भवनमध्ये घातलेला धुडघूस चागलाच चर्चेत आला होता.त्यामुळे त्यांना हे पद देवून काही अंशी नाराजी कमी करण्याचा देखील प्रयत्न कॉंग्रेसकडून होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!