🕒 1 min read
चेन्नई : कृषी कायद्यांविरोधात मागच्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनाच्या समर्थनार्थ परदेशी सेलिब्रिटीही पुढे आले आहेत. हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता देशातही एक आवाज उठविला जात आहे की, हा प्रश्न पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. यामुळे यावर बोलण्याचा अधिकार फक्त भारतीय लोकांनाच मिळाला पाहिजे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही याबाबत सरकारला पाठिंबा दिला आहे. सचिन तेंडुलकरच्या ट्वीटनंतर भारतातील अनेक क्रिकेटपटूंनी यावर ट्वीट केले होते.
भारतातील नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या शेतकरी आंदोलनाला टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंनीही पाठिंबा दिला आहे. भारत-इंग्लंड यांच्यामध्ये चेन्नई येथे उद्यापासून पहिल्या कसोटीला सुरुवात होणार आहे. त्याआधी भारतीय संघाची बैठक पार पडली. यामध्ये कसोटीसाठीच्या रणनीतीची चर्चा करण्यात आली. याचप्रसंगी टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूने शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल चर्चा केली आणि शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या ‘टुगेदर मोहिमे’ला पाठिंबा दिला.
कसोटीच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार विराट कोहली म्हणाला, देशामध्ये सुरू असलेल्या प्रकरणावर आमच्या बैठकीत चर्चा होते. शेतकरी आंदोलनाबाबतही या बैठकीत चर्चा झाली. प्रत्येक खेळाडूने आपले मतही व्यक्त केले. त्यानंतर कसोटीसाठी रणनीती आखण्यात आली.
विराट कोहलीने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, शेतकरी भारताचा प्रमुख भाग आहेत. यावेळी सर्वांनी एकत्र यायला हवे. देशातील सर्व पक्ष एकत्र येऊन या प्रकरणावर योग्य तो निर्णय घेतील, असे तो पुढे म्हणाला. याआधी परदेशी व्यक्ती, हिंद्स्थानी क्रिकेटपटूंनीही शेतकऱ्यांना सपोर्ट केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- टिकून राहायचे असेल तर भारताच्या ‘या’ फलंदाजाला लवकर बाद करणे आवश्यक : रूट
- मराठा आरक्षणासाठी महत्त्वपूर्ण दिवस; आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी…
- मोठी बातमी : चेन्नई कसोटीपुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे ‘हा’ खेळाडू बाहेर
- अखेर आज तो दिवस उजाडला ; आजपासून भारतविरुद्ध-इंग्लंड कसोटीला सुरुवात
- कर चुकवणाऱ्यांविरुद्ध जीएसटी अधिकाऱ्यांची मोहीम, 25 लाखांचा दंड वसूल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
