Share

Navneet Rana : “महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा” ; राज्यातील सत्तानाट्यावर नवनीत राणांची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : राज्यात येणाऱ्या काळात मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४६ आमदारांना सोबत घेऊन आपला वेगळा गट स्थापन केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चिंता वाढली आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेला आणि महाविकास आघाडी सरकारला धक्क्यावर धक्के देत आहेत. या सर्व  सत्तानाट्यावर अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यातील सत्तानाट्यावर अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवनीत राणा म्हणाल्या, “बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना केंद्राची सुरक्षा द्यायला हवी. राज्यातील संघर्ष पाहता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा”. मात्र राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत काय म्हणाले?

बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांची सुरक्षा काढून घेण्यात आल्यावरून एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी म्हटले की, “ते महाराष्ट्राच्या बाहेर आहे. त्यांनी ढुंगणाला पाय लावून राज्यातून पलायन केले आहे. त्यांना आमदार म्हणून सुरक्षा आहे. आमदारांना सुरक्षा असते कुटुंबियांना नाही.  महाराष्ट्रात या, आपल्या राज्यात या. असे वणवण का फिरताय?,भिकाऱ्यासारखे फिरू नका. तुम्ही वाघ आहात बकरीसारखे का म्या म्या करत आहात?”.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!