Share

Shiv Sena : राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत शिवसेनेने केले ‘पाच’ महत्वपूर्ण ठराव मंजूर

Published On: 

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करत वेगळा गट स्थापन केला आहे. याचा शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवरच आज (२५ जून) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक घेण्यात आली. या बैठकीत महत्वपूर्ण पाच ठराव मंजूर करण्यात आले.

शिवसेनेचे पाच ठराव-

शिवसेनेच्या पाच ठरावापैकी पहिला ठराव म्हणजे सर्व अधिकार हे पक्ष प्रमुखांकडे असतील. म्हणजेच उद्धव ठाकरेंकडे असतील. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची होती, आहे आणि राहणार त्यामुळे बंडखोर आमदारांनी त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा. तिसरा ठराव म्हणजे शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे पक्षप्रमुखांना अधिकार असतील. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव अन्य कुणाला वापरता येणार नाही. सेनेची मराठी अस्मितेशी आणि हिंदुत्वाशी बांधिलकी कायम राहील. असे पाच ठराव या बैठकीत मंजूर झाले आहेत.

दरम्यान यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना चांगलेच सुनावले आहे. “हिमंत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावावर निवडणूक लढवा”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. तसेच शिवसैनिकांना आज शिवसेना भवनावर जमण्याचे आवाहनही करण्यात आल्याचे कळते आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!