Share

औरंगाबादेतील बहुचर्चित ‘प्रा. राजन शिंदे खून प्रकरण’ सीआयडीमार्फत चौकशीची मागणी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : बहुचर्चित राजन शिंदे खून प्रकरणाचा निकाल लागला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलास अटक देखील केली आहे. मात्र अजूनही या खुनामागे अनेक प्रश्न अनुत्तरित असून या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी राजन शिंदे यांच्या शोकसभेत करण्यात आली आहे. एकटा अल्पवयीन मुलगा एवढी निर्घृण हत्या करू शकत नाही. असा सूर आप्तेष्ट, नातेवाईक तसेच मित्रपरिवारातून उमटत आहे.

मौलाना आझाद संशोधन केंद्रात प्रा. राजन शिंदे मित्रपरिवारातर्फे आयोजित शोकसभेस आमदार नारायण कुचे, श्रावण गायकवाड, ग. मा. पिंजरकर, प्रा. डॉ. गोपाळ बछिरे, प्राचार्य डॉ. रामदास वनारे, माजी नगरसेवक मनोज गांगवे, संजय इंगळे आदी उपस्थित होते. यावेळी आ. कुचे म्हणाले की, प्रा. शिंदे यांच्या रूपाने आपण एक हुशार व्यक्तिमत्त्व गमावले आहे. प्रा. डॉ. बछिरे म्हणाले की, अल्पवयीन मुलानेच खून केला असे होऊ शकत नाही. जी मुलगी साधी पाल किंवा झुरळ दिसले तरी ओरडते ती बापाला रक्ताच्या थारोळ्यात पाहून ओरडली नाही.

त्याचबरोबर राजन शिंदे यांच्या पत्नी एकीकडे सकाळी ७ वाजता मृतदेह पाहिला म्हणते, तर दुसरीकडे उस्मानाबादच्या प्राध्यापकाला पहाटे ५ वाजून १२ मिनिटांनी कॉल करून राजन यांचा खून झाल्याचे सांगते. यावरून ही घटना संशयास्पद असल्याचे स्पष्ट होते. डॉ. वनारे म्हणाले की, समाजाकडे लक्ष दिल्याने कुटुंबाकडे दुर्लक्ष झाले अन घात झाला. विनोद सोनवणे यांनी शिंदेंवर लिहिलेल्या ‘बाप हिटलर कसा’ या कवितेवर शोकसभेत सविस्तर चर्चा झाली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!