🕒 1 min read
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडीयावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. नुकतेच तिने देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. मात्र यावरून तिला सोशल मिडीयावर ट्रोल करण्यात आले आहे.
गृहमंत्री अमित शहा यांच्या वाढदिवसानिमित्त साराने एक ट्विट करत लिहिले की, ‘देशाचे गृहमंत्री अमित शहा जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.’ साराच्या या एका ट्विटनंतर काही वेळातच साराबद्दल ट्विटरवर मीम्सचा महापूर आला. सारा अमित शाहा यांच्या वाढदिवशी ज्या पद्धतीने त्यांना शुभेच्छा देत होती. त्यावरून सारा भविष्यकाळात NCB पासून वाचण्यासाठी असे प्रयत्न करत असल्याचे नेटकरी म्हणत आहे.
Warmest birthday wishes and regards to the Hon’ble Union Home Minister @AmitShah ji.
— Sara Ali Khan (@SaraAliKhan) October 22, 2021
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणात एनसीबीने सारा अली खानची चौकशी करण्यात आली होती. त्यावरून तिची ड्रग्स प्रकरणी मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर आता या ट्विटनंतर तिची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
His reaction ????????
Credit:@PoliticalKidaIn pic.twitter.com/plEH3WFZgu— AnOmAlIsT (@IamAnomalist) October 22, 2021
दरम्यान, अभिनेता सैफअली खान आणि अमृतां सिंह यांची मुलगी असलेल्या साराने ‘केदारनाथ’ चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर रोहित शेट्टीच्या ‘सिंबा’ मधून ती प्रसिद्धीच्या झोतात आली. या चित्रपटात तिच्यासोबत रणविर सिंह होता. आगामी काळात तिचा अक्षय कुमार आणि धनुष सोबत अतंरगी रे नावाचा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे.
https://twitter.com/MlonMast/status/1451430342544412673?s=20
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री सावरकरवादीच, कोणी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर…- संजय राऊत
- ‘कोरोनामुळे जीव गमावलेल्या ४.५३ लाख कुटुंबीयांना माफीनामा लिहून द्या’, ‘काँग्रेस’ची मागणी
- भारत-पाक सामन्यापूर्वी BCCI ने उचलले मोठे पाऊल, ‘या’ चार खेळाडूंना दिले मायदेशी परतण्याचे आदेश
- ‘नक्षलवाद आणि दहशतवादाइतकेच गांभीर्याने अमली पदार्थाच्या तस्करीत लक्ष द्यावे’
- WhatsApp ही विदेशी कंपनी, भारतीय कायद्याला विरोध करु शकत नाही; केंद्र सरकारचे खडेबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
