नाशिक : शिवसेना खासदार संजय राऊत हे सध्या नाशिक दौऱ्यावर असून यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना भाजपाकडून वारंवार केल्या जाणाऱ्या सरकार पडणार असल्याच्या दाव्याला त्यांनी प्रत्युत्तर देत अप्रत्यक्षपणे टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की,’दिल्लीत जिथे मी राहातो, तिथे चांगल्या प्रकारचे मोर आहेत. काही वेळा मी तिथे माझ्या आजूबाजूला डोमकावळ्यांची फडफड बघतो. पण ते कितीही फडफडले तरी त्यांना आमचे सरकार पाडण्याची सुपारी काही फोडता येणार नाही. तुम्ही संजय राऊतांवर कितीही आरोप करा, माझ्या पाठिचा कणा ताठ आहे आणि मन फार खंबीर आहे. मी शिवसेनेसाठी कोणतेही आणि कसेही घाव झेलायला तयार असतो.’
दरम्यान, पुढे बोलत असतांना ते म्हणाले की,’महाराष्ट्र हे तुळशी वृंदावन आहे, इथे तुळशीचं पीक जास्त आहे. पण काही लोकांना वाटतं की या राज्यात काही गांजा, भांग आपण पिकवू. पण ते शक्य नाही. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स याचे घाव तुम्ही किती करणार आमच्यावर. मी मागे म्हणालो होतो, की यातूनही सरकार पडत नसेल, तर आर्मीला बोलवा. आता आर्मीच राहिली आहे, बाकी सगळं झालंय. उद्धव ठाकरे, शरद पवार, गांदी कुटुंबाचंही तेच म्हणणं आहे की हे सरकार ५ वर्ष टिकेल आणि भविष्यातही आम्ही एकत्र राहून काम केलं, तर २५ वर्ष हे सरकार हलणार नाही,’ असा दावाही यावेळी राऊतांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री सावरकरवादीच, कोणी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर…- संजय राऊत
- ‘कोरोनामुळे जीव गमावलेल्या ४.५३ लाख कुटुंबीयांना माफीनामा लिहून द्या’, ‘काँग्रेस’ची मागणी
- भारत-पाक सामन्यापूर्वी BCCI ने उचलले मोठे पाऊल, ‘या’ चार खेळाडूंना दिले मायदेशी परतण्याचे आदेश
- ‘नक्षलवाद आणि दहशतवादाइतकेच गांभीर्याने अमली पदार्थाच्या तस्करीत लक्ष द्यावे’
- WhatsApp ही विदेशी कंपनी, भारतीय कायद्याला विरोध करु शकत नाही; केंद्र सरकारचे खडेबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

