🕒 1 min read
गडचिरोली : छत्तीसगढ राज्यातील राजनंदगाव या वन विभागातून 18 हत्तींचा एक कळप गडचिरोली जिल्ह्यामध्ये आला आहे. सध्या या हत्तींचं वास्तव्य मुरुमगाव आणि दक्षिण धानोरा इथल्या जंगलांमध्ये आहे. या कळपामध्ये तीन पिलं आणि इतर वयस्कर हत्ती आहेत. दरम्यान, या हत्तींबाबत सर्वसामान्य लोकांनी कोणती खबरदारी बाळगावी याबद्दल गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक डॉक्टर किशोर मानकर यांनी दिली.
मानकर म्हणाले, सध्या जंगलात खाद्य वनस्पती आणि पाणी मुबलक प्रमाणात असेल तरी जंगलाच्या शेजारी शेती मध्ये धान पिक कापणीला आहे आणि हे हत्तीच आवडतं खाद्य आहे. त्यामुळे हे हत्ती शेतावर जाऊन धनाच नुकसान करू शकतात पण जर यांच्या जास्त जवळ गेल्यास हे हत्ती शेतकऱ्यांवर किंवा गावातल्या लोकांवर हल्ला करू शकतात उपवनसंरक्षक गडचिरोली यांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत सूचना केल्या आहेत तसंच आमचे क्षेत्रीय कार्यकारी गावातील लोकांना याबाबत दवंडी देऊन तसाच त्यांच्या सभा घेऊन हत्ती पासून सतर्क राहण्याच्या सूचना देत आहेत.
माझे सर्वांना आवाहन आहे की हत्तीच्या जवळ जाऊ नये आणि हत्तीला त्रास होईल अस कोणतही कृत्य करू नये जसं की फटके फोडणे,आवाज करणे त्यामुळे आपण सर्वांनी सुरक्षित राहून स्वतःची काळजी घ्यावी शेत पिकाचे नुकसान झाले तर वन कर्मचाऱ्यांना सूचना देऊन शेतीचा आणि झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नियमाप्रमाणे पिक नुकसानीची त्यांना भरपाई मिळेल.
महत्वाच्या बातम्या
- देशातील शिक्षण प्रगत झाल्याशिवाय उद्योगविश्व किंवा जगाचे लक्ष आपल्याकडे जाणार नाही – सामंत
- मुख्यमंत्री घराबाहेर पडले ही खरी बातमी असावी; मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरुन भातखळांची टीका
- आरएसएस विरोधात वक्तव्य केल्याने जावेद अख्तर यांच्या विरोधात तक्रार दाखल
- ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा संकटात, आरक्षण अध्यादेशाला हायकोर्टात आव्हान
- पेट्रोल-डिझेलच्या दरात ‘अच्छे दिन’ नाहीच!, १२० रुपयाकडे वाटचाल

