🕒 1 min read
नवी दिल्ली: मोदी सरकारने पुन्हा एकदा गरीब श्रमिक आणि ज्येष्ठ व्यक्तींसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे गरीब श्रमजीवी लोकांना मोठा आधार मिळणार आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक हातावर पोट असणाऱ्या लोकांचा रोजगार गेला होता. त्यामुळे अनेक गरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती. या पार्श्वभूमीवर ही योजना महत्त्वाची ठरत आहे.
‘पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना’ असे या योजनेचे नाव असून ही योजना २०१९ मध्ये सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत म्हणजे 4 मार्च 2021 पर्यंत या योजनेमध्ये 44.90 लाख श्रमिकांनी नोंदणी केली असून यासाठी 18 ते 40 वयोगटापर्यंतच्या व्यक्ती ज्यांचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा कमी आहे पात्र ठरतात.
या योजनेअंतर्गत 55 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत 18 ते 40 वर्षाच्या व्यक्तीला अनुक्रमे 55, 100, 200 असे मासिक पैसे गुंतवावे लागणार आहेत. भारतीय जीवन विमा निगम च्या माध्यमातून ही योजना चालवली जात आहे. यामध्ये असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या श्रमिकांना वयाची साठ वर्षे पूर्ण केल्यानंतर तीन हजार रुपये प्रति महिना मानधन देण्यात येणार आहे.
यासाठी लाभार्थ्यांना योजनेत नाव नोंदविन्याकरिता आधार कार्ड, बँक खात्याचे पासबुक याच्या फोन सर्विस सेंटर ला जाऊन खाते सुरू करावे लागणार आहे. त्यानंतर संबंधितांना श्रमयोगी कार्ड दिले जाईल. या योजनेच्या अधिक माहितीसाठी 1800-267-6888 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- वेस्ट इंडिजच्या महान बॅट्समन व्हिव रिचर्ड्स यांनी मोदींचे आभार; सत्य काय जाणुन घ्या
- कोरोनामुळे चार महिन्यांनंतर पुन्हा तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी बंद
- विजयानंतर मायकल वॉनची भारतीय संघाची ‘या’ संघासोबत तुलना!
- जालन्यात लॉकडाऊन की कडक निर्बंध? आज होणार निर्णय
- ऑनलाईन खरेदी च्या काळात ग्राहकांच्या हक्कांच संरक्षण महत्त्वाचं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
