मुंबई : कोरोना व्हायरसच्या विरोधातील लढाईमध्ये भारताने मैत्री अभियानाच्या अंतर्गत अनेक देशांना कोरोना वॅक्सिनचा पुरवठा केला आहे. याच अभियानाच्या अतंर्गत भारताने मागच्या आठवड्यात वेस्ट इंडिज बेटावरच्या अॅण्टिग्वा, बार्बोडस, सेंट किट्स आणि नेविस, सेंट विंसेन्ट, सुरीनाम यासारख्या कॅरिकॉम देशांना कोरोना वॅक्सिनचा डोस दिला आहे.
वेस्ट इंडिजच्या दिग्गज क्रिकेटपटूंनी भारताच्या या उदारतेबद्दल आभार व्यक्त केले आहेत. या संदर्भात ‘डीडी न्यूज’ने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये वेस्ट इंडिजचे माजी कॅप्टन व्हिवियन रिचर्ड्स रिची रिचर्डसन तसंच जिमी अॅडम्स यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत साथ देण्यासाठी भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
West Indies cricketing greats Vivian Richards, Richie Richardson, Jimmy Adams and Ramnaresh Sarwan thank India and PM @narendramodi for the donations of Made In India vaccine pic.twitter.com/DgskdkDoGo
— DD News (@DDNewslive) March 14, 2021
अॅण्टिग्वा आणि बार्बोडस देशांतील नागरिकांच्या वतीने व्हिवियन रिचर्ड्स यांनी मोदींचे आभार मानले आहेत. ‘भारताने आम्हाला कोरोना वॅक्सीनचा पुरवठा केला, त्यामुळे आमचे संबंध आणखी घट्ट झाले आहेत,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तर रिची रिचर्ड्सन यांनी ४० हजार डोस पाठवल्याबद्दल भारत सरकार आणि मोदींचे आभार व्यक्त केले आहे. मैत्री अभियानाच्या अंतर्गत भारताने यापूर्वी भूतान, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका या देशांना कोरोना वॅक्सिनचा पुरवठा केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘या’ भाजप खासदाराच्या सुनेने केला जीवन संपविण्याचा प्रयत्न
- धोनी म्हणतो लालच इज कुल; आयपीएल १४ चा प्रोमो प्रदर्शित
- रॅलीनंतर कमल हसन यांच्या गाडीवर हल्ला ; आरोपी अटकेत
- ऐन उन्हाळ्यात एसी, फ्रिजच्या दरवाढीने ग्राहकांच्या खिशाला आणखी झळ
- ‘कृषी कायद्यामुळं शेतकरी जसे अस्वस्थ आहेत, तशी संसदही अस्वस्थ आहे’


