मुंबई : संपूर्ण जगात १५ मार्च हा दिवस ‘जागतिक ग्राहक हक्क दिन’ म्हणून साजरा केला जातो. अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीमध्ये १९६० मध्ये ग्राहकांच्या प्रश्नाचे निवारण करण्यासाठी तसेच ग्राहकांना सेवा पुरवताना होणार्या हलगर्जीपणामुळे टाळण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यात आले. याची जागतिक स्तरांवर पाठपुरावे करून त्याला यूनेस्कोनेही मान्यता दिली. त्यानुसार दरवर्षी १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.
भारत सरकारने ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी २६ डिसेंबर १९८६ ह्या दिवसापासून ‘ग्राहक संरक्षण कायदा’ अंमलात आणला . परंतु हा कायदा आमलात आणून २५ वर्ष उलटली तरी आजही ग्राहकांचे होणारी फसवणूक थांबली नाही. यासाठी कोठे तरी ग्राहक देखील जबाबदार असल्याचे समजते आहे. आपली फसवणूक झाली हे माहित असताना देखील ग्राहक याबाबतची तक्रार करत नाहीत. यामुळे व्यापारांना याचा वाव मिळतो आणि ग्राहकांची होणारी फसवणूक वाढतच जाते. अनेकांना तर या कायद्याबाबतची काहीच माहिती नसते. त्यामुळे आजही अनेक ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर लुट होत आहे.
ग्राहक संरक्षण कायद्याच्या आधारे काही प्रश्न सोडविता येऊ शकतात परंतु त्याला काही मर्यादा आहेत. त्यासाठी आपले प्रश्न सोडविण्यासाठी स्वत:च पुढाकार घेतला पाहिजे. या कायद्याची प्रबोधन व जागृती करणे आवश्यक आहे. आज अर्थव्यवस्थेचे स्वरूप वेगाने बदलत आहे. हल्लीच्या काळामध्ये ऑनलाईन खरेदी विक्रीमध्ये देखील ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लुट करून फसवणूक केली जाते. तर दुसरीकडे, अनेक पदार्थांमध्ये भेसळ केली जात आहे. यामुळे ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- विराटची नाबाद खेळी ; ‘या’ खेळाडूने दिला होता कानमंत्र
- रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली
- दोन दिवसात संपलेल्या कसोटी सामन्यावर आयसीसीचा रीपोर्ट प्राप्त
- चहलचे टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी
- ‘भंपक गोस्वामीला पकडले, टीआरपी घोटाळा उघड केला त्या बदल्यात केंद्राने वाझेंना पकडून दाखवले’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

