Share

“साडेसात वर्षांपासून सत्तेत असलेले मोदी सरकार चुका मान्य न करता नेहरूंना दोष देतात’, मनमोहन सिंग यांनी सुनावले

Published On: 

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान मनमोहन सिंह (Former Prime Minister Manmohan Singh) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना चांगलेच सुनावले आहे. पंजाबमधील ११७ जागांसाठी रविवारी मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग यांनी चित्रफीत प्रसिद्ध करत मतदारांना अप्रत्यक्षपणे संदेश दिला आहे.

मनमोहन सिंह यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “एकीकडे जनतेला महागाई आणि बेरोजगारीच्या समस्या भेडसावत आहेत, तर दुसरीकडे गेल्या साडेसात वर्षांपासून सत्तेत असलेले विद्यमान सरकार आपल्या चुका मान्य करून त्या सुधारण्याऐवजी पंतप्रधान नेहरूंना दोष देत आहे.”, अशा शब्दांत त्यांनी मोदींना सुनावले आहे.

तसेच मौनमोहन, कमकुवत पंतप्रधान, भ्रष्टाचारी असे खोटे आरोप करणाऱ्या भाजपा आणि त्यांच्या ‘ब’आणि ‘क’चमूंच्या दुष्प्रचारांचे पितळ जनतेसमोर उघडे पडले आहे. आता लोक २००४ ते २०१४ या काळातील काँग्रेस सरकारने केलेल्या कामांची आठवण काढत आहेत. मी १० वर्षे पंतप्रधानपद भूषवले, पण बोलण्यापेक्षा काम करण्याला अधिक प्राधान्य दिले. असेही मनमोहन सिंह यांनी म्हटले आहे.

तसेच सध्या देशातील परिस्थिती गंभीर असून कोरोना काळातील केंद्राच्या दूरदृष्टीच्या अभावामुळे अर्थव्यवस्थेची दुरवस्था झाली आहे. लोकांना महागाई आणि बेरोजगारी सहन करावी लागत आहे. श्रीमंत अजून श्रीमंत, गरीब अजून गरीब होत आहेत. साडेसात वर्षे सरकार चालवल्यानंतरही स्वत:च्या चुकांचे खापर मोदी सरकार पं. नेहरूंवर टाकत आहेत. त्यामुळे मोठमोठय़ा गप्पा मारणे सोपे असते मात्र त्या प्रत्यक्षात उतरविणे ठीण असते. असा टोमणाही मनमोहन सिंह यांनी मारला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!