🕒 1 min read
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोर्लई गावात १९ बंगले असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. यावरूनच खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी (१५ फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत सोमय्यांच्या आरोपाला प्रतिउत्तर दिले होते. तर आज किरीट सोमय्या थेट कोर्लई गावात जाणार (Kirit Somaiya will visit Korlai village today) आहे.
दरम्यान कोर्लई गावात किरीट सोमय्या यांना विरोध केला जात असून आता पुन्हा एकदा शिवसैनिक आणि सोमय्या आमने-सामने येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र तरीही राज्यातील जनतेला वास्तव कळावे, म्हणून किरीट सोमय्या कोर्लई गावात जाण्यासाठी निघाले आहेत.
तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी कोर्लई गावात १९ बंगले बांधले. असे असले तर आपण सर्व पत्रकार तिथे पिकनिकला जाउत. आणि बघुत खरच तिथे बंगले आहेत का? आणि जर तिथे बंगले असतील तर मी राजकारण सोडेल, अन्यथा शिवसेना किरीट सोमय्या यांना जोड्याने मारेल. असा मोठा दावा केला होता. आता आज सोमय्या कोर्लई गावात पोहचतात, की त्यापूर्वीच नवे वादंग उभे ठाकते हे लवकरच कळेल.
महत्वाच्या बातम्या:
- ‘देवेंद्रजी ३०-३५ पुरणपोळ्या पातेलंभर तुपासोबत खायचे’, अमृता फडणवीसांचा अजब खुलासा
- रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात कर्णधार मनीष पांडेचे शतक
- अर्जुनचे सामने पाहायला मी कधीच जात नाही ; कारण…
- टीका करून जे गाजावाजा करतात … ; उदय सामंत यांचा राणेंना टोला
- राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या शिवसेना नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
