नांदेड : देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मतदारसंघात प्रचारसभेसाठी सज्ज झाले आहेत. प्रचार सभेत फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘महाविकास आघाडीतील लोक कशात भ्रष्टाचार करतील याचा नेम नाही. जमेल त्यात खात आहेत. सामान्य माणसाची अवस्था वाईच आहे’, असं फडणवीस म्हणाले आहेत.
एका मंत्र्याचा जावई गांजा विकताना आढळून आला. पण मंत्री म्हणतो की ही हर्बल तंबाखू आहे. मग आमचे सदाभाऊ खोत म्हणाले की आमच्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. तुमचा मंत्री हर्बल तंबाखू पिकवू शकतो तर शेतकऱ्यांनाही हर्बल तंबाखू लावायची परवानगी द्या. म्हणजे शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, अशी खोचक टीका फडणवीस यांनी नवाब मलिकांवर केली आहे.
LIVE | Addressing public meeting at Kundalwadi in Nanded district for Deglur by-election.
नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी येथे देगलूर पोट-निवडणुकीसाठी प्रचारसभा@BJP4Maharashtra #BJP #Nanded #Deglur https://t.co/kMoUhOXTd8— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 25, 2021
अतिवृष्टीत मोठं नुकसान झालं पण या सरकारने रुपयांची मदत केली नाही. बोलायला बांधावर जातात, मोठ्या घोषणा करतात. पण यांचे पैसे सरकारला मिळत नाहीत. पीक विम्याचे पैसेही शेतकऱ्यांना मिळत नाहीत. हे इतके लबाड आहेत की काहीही झालं की केंद्रावर ढकलतात. बायकोनं मारलं तरी केंद्रानं मारलं असं सांगतील, अशी खोचक टीका फडणवीसांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- पंच प्रभाकर साईलच्या आरोपानंतर, समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ; खात्याअंतर्गत होणार चौकशी
- सणोत्सवांच्या अनुषंगाने ग्रामीण भागातील लसीकरण वाढविण्यासाठी नियोजन करा – भुजबळ
- ‘नवाब मलिकजी, माझी मृत आई आणि तिचा धर्म मध्ये का आणताय?; ‘त्या’ ट्विटवरून समीर वानखेडेंचा प्रश्न
- पुण्यातील हत्या झालेल्या कबड्डीपटू मुलीच्या कुटुंबियांचे चंद्रकांत पाटलांकडून सांत्वन
- भारतात द्वेष पसरवणारी माहिती हाताळण्यात फेसबुक असमर्थ


