Share

‘नवाब मलिकजी, माझी मृत आई आणि तिचा धर्म मध्ये का आणताय?; ‘त्या’ ट्विटवरून समीर वानखेडेंचा प्रश्न

Published On: 

मुंबई : आर्यन खान अमली पदार्थ प्रकरणातील पंच प्रभाकर साईलने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोपाला सुरूवात झाली आहे. एनसीबीने मात्र आरोप फेटाळले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीटरला एक फोटो शेअर केला होता. त्यालाच प्रत्युत्तर देत नवाब मलिक माझी मृत आई आणि तिचा धर्म या प्रकरणात मध्ये का आणत आहेत, असा सवाल समीर यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी आपल्या ट्वीटमध्ये समीर वानखेडेंशी संबंधित कागदपत्राचा फोटो शेअर केला आहे. तसेच वानखेडे यांचा सगळं घोटाळा इथूनच सुरु होत असल्याचेही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार ट्विटसंदर्भात बोलतांना समीर म्हणाले की, ‘नवाब मलिक यांनी त्यांच्या जन्माच्या प्रमाणपत्रासंदर्भात नुकत्याच केलेल्या ट्विटबद्दल मला कळले. माझ्या जन्म प्रमाणपत्राचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही. तरीही हे सर्व इथं एकत्र करण्याचा घाणेरडा प्रयत्न आहे. माझी आई मुस्लिम होती म्हणून त्यांना माझ्या मृत आईला या सगळ्यात आणायचे आहे का? माझी जात आणि कौटुंबीक पार्श्वभूमी पडताळून पाहण्यासाठी तो, तुम्ही किंवा कोणीही माझ्या जन्मगावी जाऊन माझ्या पणजोबांकडून माझ्या वंशाची पडताळणी करू शकतात, पण त्यांनी अशी घाण पसरवू नये. मी हे सर्व कायदेशीररित्या लढेन आणि न्यायालयाबाहेर यावर जास्त भाष्य करू इच्छित नाही.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!