Share

पंच प्रभाकर साईलच्या आरोपानंतर, समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ; खात्याअंतर्गत होणार चौकशी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी धक्कादायक खुलासे केल्यानंतर आता एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची खात्यांअंतर्गत चौकशी होणार आहे. प्रभाकर यांनी केलेल्या आरोपानंतर समीर आणि प्रभाकर यांची अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्यामार्फत चौकशी केली जाणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार व्हिजिलन्स विभागाकडे हा तपास सोपवण्यात आला असून तपास संबधित विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर सिंह हे यासंदर्भात चौकशी करणार आहेत. या चौकशीसाठी समीर वानखेडे यांना दिल्लीला बोलाविण्यात आले आहे. तसेच पंच प्रभाकर साईल यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. या संपूर्ण चौकशीनंतर याचा अहवाल व्हिजिलन्स विभागाकडे देण्यात येणार आहे. त्यानंतर समीर वानखेडेंच्या तपासाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, प्रभाकर साईल यांनी यांनी ड्रग्जप्रकरणी आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर त्याला सोडून देण्यासाठी मध्यस्थांमार्फे शाहरुख खानकडे २५ कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला होता. तसेच एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितल्यानंतर आपण पंच म्हणून कोऱ्या कागदावर सही केल्याचेही साईल यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!