पुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरल्याचे दिसत आहे. राज्यातील विविध भागात आज भारतीय हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे. यामध्ये राज्यातील पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. तर मुंबईसह ठाणे परिसरात हवामान खात्यानं आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.या जिल्ह्यांत आज अतिवृष्टी होणार असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे.
या पाच जिल्ह्यात पुढील चोवीस तासांत 204.4 मिलिमिटर पेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. गुरुवार नंतर राज्यात पावासाचा जोर काहीसा कमी होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम राहाणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Maharashtra | Heavy rainfall causes waterlogging in Mumbai's Sion area. pic.twitter.com/g9dNGPI62Y
— ANI (@ANI) July 14, 2021
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी वेग पकडून मान्सून केरळातून महाराष्ट्रात धडकला होता. त्यामुळे सुरवातील पावसाने चांगलाच जोर धरला होता. मात्र मध्यंतरी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे जाणवले. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरवात झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
- करन्सी नोट प्रेसमधील 5 लाख चोरी प्रकरण, नाशिक पोलिसांच्या तपासाला सुरवात
- लडाख कचरा प्रकरणावर आमिरच्या टीमने सोडलं मौन, म्हणाले….
- ‘संजय राऊत यांनी माझ्या मनातलं बरोबर ओळखलं आणि तेच अग्रलेखात लिहिलं’
- झोटिंग समितीचा गायब अहवाल सापडला, एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार?
- आर्यलँडचा दक्षिण आफ्रिकेवर ४३ धावांनी धक्कादायक विजय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

