Share

खासदार छत्रपती संभाजी म्हणतात, नियम पाळणाऱ्या व्यापाऱ्यांना सूट तर मोडणाऱ्यांवर कारवाई करा

Published On: 

कोल्हापूर : राज्यात कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता असल्याने खासदार छत्रपती संभाजी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी लॉगडाऊन लावण्यापूर्वी आणि नंतर करावयाच्या उपाय-योजनांची माहिती दिली आहे. इतकेच नाही तर जे व्यापारी आणि उद्योजक नियम पाळतात, त्यांना लॉकडाऊनमधून सूट देण्यात यावी. आणि जे नियम मोडतात त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील खासदार संभाजी यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी लिहिले की, ‘मागील लॉकडाऊनचा अनुभव पाठीशी असल्याने या लॉकडाऊनमध्ये कोणत्याही घटकाची आर्थिक कुचंबणा होऊ नये, कोणावरही उपासमारीची वेळ येऊ नये, या दृष्टीने प्रथम योजनांची आखणी करावी. या योजनांच्या अंमलबजावणीस सक्षम यंत्रणा कार्यान्वीत करावी. लॉकडाऊनमधील वीजबील, कर आकारणी, कर्जाचे हफ्ते यांचा भार शेतकरी, कामगार, व्यापारीवर्ग व उद्योजक यांना सोसावा लागू नये, यासाठी आधीच धोरण निश्चित करावे. यात प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणाऱ्या उद्योगांना, व्यापाऱ्यांना सूट द्यावी व नियम मोडणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई करावी.’

त्याच बरोबर लॉकडाऊनच्या काळात आयोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर द्यावा अशी मागणी देखील संभाजीराजे यांनी केली आहे. राज्यात सध्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. यावर त्यांनी पत्रात लिहिले की, ‘रेमडेसिविर इंजेक्शनचा होत असलेला काळाबाजार व साठेबाजीस आळा घालण्यासाठी या इंजेक्शनचे वितरण संपूर्णत: राज्य शासनाच्या नियंत्रणात घ्यावे. बंद केले जम्बो कोव्हीड सेंटर पुन्हा कार्यान्वीत करावे.’

लॉकडाऊन हा कोरोना रोखण्यासाठी सर्वात चांगला पर्याय नसला तरी वाढती रुग्ण संख्या पाहता सध्या लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. त्यामुळे लॉकडाऊनला विरोध न करता, अनेक नेत्यांनी सर्वसामान्यांना आर्थिक पॅकेज देण्याची मागणी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!