🕒 1 min read
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणचा मुद्दा चर्चेत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यापासून पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. न्यायालयाच्या निकालामुळे मराठा समाजात मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह अनेक मराठा नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची वेळ मागितली होती. मात्र, त्यांनी अद्याप वेळ दिली नसल्याने संभाजीराजे यांनी उघड नाराजी व्यक्त होती. दरम्यान, मराठा नेत्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने राज्य सरकारवरील दबाव अधिक वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांची भेट मिळावी म्हणून पंतप्रधान कार्यालयाला विनंती केली होती.
आता पंतप्रधान कार्यालयाने ही विनंती मान्य केली असून उद्धव ठाकरे यांना उद्या मंगळवारी भेटीची वेळी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांच्याशी मराठा आरक्षणावर चर्चा करतील. यावेळी आघाडी सरकारमधील काही मंत्री त्यांच्यासोबत असतील अशी माहिती सध्या तरी मिळत आहे. या भेटीमध्ये पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यामध्ये मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे.
या भेटीत केंद्र सरकारने काय केल्यास मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो, यावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. तसेच घटनादुरुस्ती आणि मागासवर्ग आयोगाच्या अनुषंगानेही या भेटीत चर्चा करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मोदी-ठाकरे यांची पहिल्यांदाच भेट होत आहे. या भेटीतून मराठा आरक्षणावर मार्ग निघण्याची दाट शक्यता असल्याने त्याकडे संपूर्ण मराठा समाजासह राज्याचे लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ब्लू टीक’ पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे लक्ष द्या: मलिकांनी फटकारले
- बाहेर लोकांना उपदेश करणाऱ्या बुवाने केली पत्नीला मारहाण; सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल
- ‘सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन जनतेने केल्याने कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येतेय’
- चोराच्या उलट्या बोंबा : मी उपचारासाठी देश सोडला; पळून गेलेलो नाही – चोक्सी
- 12 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांवरील कोरोना लसीच्या चाचणीला राज्यात प्रारंभ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
