मुंबई : केंद्र सरकार आणि ट्विटरमध्ये पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला आहे. पराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाऊंटवरून निळे टिक हटविण्यात आले होते. त्यानंतर काही वेळातच आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या अकाऊंटवर देखील अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आरएसएसच्या अनेक नेत्यांच्या खात्यातून निळा टिक हटविला गेला.
त्यानंतर काही वेळात केंद्र सरकारकडून ट्विटरला अखेरची नोटिस जारी करण्यात आली आहे. या नोटिशीत ट्विटरला स्पष्ट शब्दात इशारा देण्यात आला आहे. ट्विटरने नियम मान्य करावेत अथवा भारतीय कायद्यानुसार, परिणाम भोगण्यासाठी तयार रहावे, असे या नोटिशीत म्हणण्यात आले आहे. यानंतर आता केंद्राने कारवाईचा इशारा देताच ट्विटरने आरएसएस प्रमुख मोहन भागवतांसह अन्य नेत्यांचे ब्यू टीक परत केले होते.
याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी टोला लाग्वला आहे. नवाब मलिक यांनी लसीकरणाच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला लक्ष्य केले. ट्वीटरवर संपूर्ण भाजप आणि केंद्रसरकार ‘ब्लू टीक’ ची लढाई लढताना दिसत आहे तर दुसरीकडे देशातील जनता लसीकरणाची लढाई लढत आहे. ट्वीटरवरील ‘ब्लू टीक’ असेल किंवा कोरोना काळातील लोकांचे लसीकरण असेल यावरून केंद्रसरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे मात्र याकडे दुर्लक्ष करून केंद्रसरकार आपल्याच अहंकारात मश्गुल असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री तरला जोशी यांचे निधन
- बाहेर लोकांना उपदेश करणाऱ्या बुवाने केली पत्नीला मारहाण; सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल
- ‘सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन जनतेने केल्याने कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येतेय’
- चोराच्या उलट्या बोंबा : मी उपचारासाठी देश सोडला; पळून गेलेलो नाही – चोक्सी
- 12 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांवरील कोरोना लसीच्या चाचणीला राज्यात प्रारंभ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

