पिंपरी-चिंचवड : अभाविपचे ५५ वे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन पिंपरी-चिंचवड शहरातील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह या ठिकाणी ७ फेब्रुवारी रोजी पार पडले. या उदघाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पद्मश्री गिरीष प्रभुणे, अभाविप राष्ट्रीय अध्यक्ष छगनभाई पटेल, पिंपरी चिंचवड प्रथम नागरिक महापौर उषा ढोरे, स्वागत समिती अध्यक्ष उद्योजक सुधीर मेहता, स्वागत समिती सचिव मोरेश्वर शेंडगे इत्यादी मान्यवर उदघाटन प्रसंगी उपस्थित होते.
प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्हयातून उपस्थित असलेल्या छात्रशक्तीला संबोधित करत असताना अनुभव आधारित शिक्षण याचा आम्ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात समावेश केला आहे. विद्यार्थी हित हेच आमच्या सरकारचे धोरण आहे, असे मत व्यक्त केले. पुढे त्यांनी अभाविपमध्ये काम करतानाचे अनुभव देखील सांगितले.
‘कामाचा आनंद घेणे हे मला विद्यार्थी परिषदेने शिकवले, मी ज्यावेळेस परिषदेचे काम करत होतो, तेव्हा जे. पी. आंदोलनात सक्रिय सहभाग राहिलेला आहे. आणीबाणी देशावर लादली त्यावेळी आम्ही अनेक ठिकानी सत्याग्रह केले याचा मला अभिमान आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आम्ही लढलो. पुढे त्यांनी कृषी आंदोलनामध्ये ट्रॅक्टर रॅलीमध्ये शेतकऱ्याचा मृत्यू हा पोलिसांची गोळी लागून झाल्याचे चुकीचे वृत्त काही वाहिन्यांनी लावले. मात्र, व्हिडीओमध्ये सरळ सरळ दिसत आहे की त्यांनी ट्रॅक्टर बॅरीकेड्सला धडकावले व ट्रॅक्टर पलटी झाल्याने मृत्यू झाला,’ असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.
‘सध्या माध्यम चुकीच्या बातम्या पसरवून समाजात दुही निर्माण केली जाते, परंतु भारताला जोडण्याचे काम विद्यार्थी परिषदेने केले आहे. माध्यमांना व्यक्तिस्वातंत्र्य आहे, मात्र सत्य न पडताळता देश विभागेलअसं कृत्य करू नये. जगात भारत एकमेव देश आहे ज्याने कोरोना विषाणुवर लस तयार केली आहे व अनेक देशांना आपण लस वितरित करत आहे,’ असं जावडेकर म्हणाले.
तर, ‘सेवा विषयात अग्रगण्य कार्य केलेल्या पद्मश्री घोषित गिरीष प्रभुणे यांनी मला सामाजिक कामाचे धडे विद्यार्थी परिषद कार्यकर्ता असल्यापासून मला मिळाले, त्यातून प्रेरणा घेऊन पिंपरी चिंचवड येथील ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’ तसेच यमगरवाडी येथील भटक्या विमुक्त विद्यार्थ्यांसाठी काम करत राहिलो समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळावा यासाठी मी कटिबद्ध राहिल. अभाविप कार्यकर्त्यांनी देखील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी अधिक प्रयत्न करावे,’ असे मत त्यांनी व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या
- ‘पवारांचा जन्मच पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहण्यात जाणार ही मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेघ’
- मराठवाड्यात फायर ऑडिटच्या नुसत्याच घोषणा, समिती कागदावरच
- जालना रोडवर दररोज हजारो लीटर पाण्याचा अपव्यय, मनपाचे दुर्लक्ष
- ‘न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे पोहोचले आहे’
- ‘एमएसपी आहे तर कायदा बनवा’ एमएसपीवरून शेतकरी आणि सरकारमध्ये पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

