🕒 1 min read
मुंबई:- राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सत्तांतर होण्याचे संकेत दिलेत. फासा आम्हीच पलटणार. शिडीशिवाय फासा पलटणार, असं म्हणत राजकीय वर्तुळात देवेंद्र फडणवीस यांनी खळबळ उडवून दिली आहे.
दरम्यान, राज्यसभा खासदार नारायण राणे यांची 22 वर्ष मुख्यमंत्री पदाची स्वप्नं पाहण्यात गेली, आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचीही जातील, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.
दरम्यान, मलिक यांच्या टीकेला भाजप नेते आचार्य तुषार भोसले यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. ‘नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री राहिले आहेत. तुमच्या नाकावर टिच्चून देवेंद्र फडणवीसजी लवकरच पुन्हा मुख्यमंत्री होतील. कारण ते त्यांचं नाही तर जनतेचं स्वप्न आहे. जनतेने त्यांच्याच नेतृत्वावरच शिक्कामोर्तब केला होता. पण तुमच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा जन्मच पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहण्यात जाणार ही मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. तेव्हा ‘अल्प मंत्री’ असलेल्या आपण बहु चिंता करु नये’, अशी टीका भोसले यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- विराट कोहलीनंतर रिषभ पंतने केला ‘हा’ मोठा पराक्रम
- ‘देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली आहे’
- मुख्यमंत्रीपदाबाबत दिलेल्या वचनाच्या वादात नेमकं खोटं कोण बोलत आहे ?
- ‘न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे पोहोचले आहे’
- मिया खलिफा कंत्राटी शेतीचे सर्वश्रेष्ठ उदाहरण असल्याचा रिटायर्ड IAS अधिकाऱ्याचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
