Share

जालना रोडवर दररोज हजारो लीटर पाण्याचा अपव्यय, मनपाचे दुर्लक्ष

Published On: 

औरंगाबाद : रविवारी पहाटे शहराला पाणीपुरवठा करणारी १४ मिमी व्यासाची जलवाहिनी हॉटेल विट्स स्टेशन रोडवर फुटली. जवळपास दहा फुट उंच फवारे उडाले. लाखो लिटर पाणी वाया गेले असून अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले. अनेकांचे यामुळे नुकसान झाले. दिवसभर या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले. मात्र शहरातील अनेक ठिकाणी जलवाहिनी फुटून पाणी वाया जाण्याच्या घटना दररोज घडतात. जालना रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ, दूध डेअरी, न्यायालयाच्या समोरच्या बाजूस दररोज हजारो लिटर पाणी वाया जाते. मात्र याची दखल मनपाकडून घेतली जात नसल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवर पाण्याचे पाट वाहतांना दिसून येतात.

शहराला मनपाच्या वतीने ७०० आणि १४०० मिमि व्यासाच्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. दोन्ही जलवाहिन्यांचे लाईफ संपल्याने सध्या दोन्ही योजनांचे आयुष्य संपल्याने या दोन्ही जलवाहिन्यांना गळती लागण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. काल झालेल्या नुकसाना नंतर आज सकाळी जालना रोडवर पाहणी केली असता उच्च न्यायालयाच्या समोरून ते थेट क्रांती चौकापर्यंत पाण्याचे पाट वाहतांना दिसून आले. यामुळे रस्त्याच्या बाजूला संपूर्ण चिखल झाला होता. यावरून जातांना अनेक दुचाकीधारकांची तारांबळ उडत होती. जालना रोडवर नेहमीच अशाप्रकारे जलवाहिन्यांना गळती लागल्यामुळे पाणी दिसून येते.

मात्र महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी दररोज हजारो आणि महिनाभरात लाखो लिटर पाणी वाया जाते. शहरात पाणी संकट कायम आहे. नवीन पाणीपुरवठा योजना आत्ताच कार्यान्वित झालेली आहे. त्यामुळे ही योजना पूर्ण होऊन घरोघरी पाणी येण्यास तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. मात्र रोज अशाप्रकारे होणारी पाण्याची नासाडी पाहता अनेक गरजू पाण्यापासून वंचित राहतात.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!