Share

स्पुतनिक लसीचा जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात मोठा साठा उपलब्ध होणार : आरोग्यमंत्री

Published On: 

मुंबई : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेली जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

लसींचा तुटवडा असल्याने मोजक्याच ठिकाणी लसीकरण केले जात आहे. तर, नोंदणी केल्यानंतरच लसीकरण होत असले तरी साठा उपलब्ध झाला नसल्याचे कारण लसीकरण केंद्रावर दिले जात असल्याने अनेक नागरिकांना विना लसीकरणच माघारी यावं लागत आहे. यामुळे लोकांचा संताप सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ‘स्पुतनिक लसीच्या वितरकांशी चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी ही चर्चा पूर्ण झाली आहे. त्यानुसार येत्या जुलै किंवा ऑगस्टमध्ये स्पुतनिक लसींचा मोठा साठा उपलब्ध होणार आहे,’ असे राजेश टोपे म्हणाले आहेत.

या संदर्भात बोलताना ते म्हणाले कि, ‘राज्यात सध्या 18 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण करायचं आहे. मात्र सध्या लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे स्पुतनिक लसीच्या वितरकांशी चर्चा झाली आहे. येत्या जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात स्पुतनिक लसींचा मोठा साठा उपलब्ध होणार आहे,’ अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!