Share

दिलीप कुमार यांची प्रकृत्ती खालावली; शरद पवार भेटीसाठी रुग्णालयात

Published On: 

मुंबई : बॉलीवुडचे जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने आज रविवारी सकाळी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसापासुन त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

९८ वर्षीय दिलीप कुमार यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते. यामुळे त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हिंदुजा रुग्णालयातील नॉन कोविड वार्डात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मागील महिन्यातही प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज नियमीत तपासणी आणि श्वास घ्यायला होत असलेल्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान त्यांची भेट घेवून तब्यतेची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांनी ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची हिंदुजा रुग्णालयात भेट घेतली. याबटची माहिती त्यांनी स्वत: ट्वीट करून दिली आहे. ‘खार हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमारजी आणि ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती सायरा बानो यांची आज भेट घेतली. त्याच बरोबर त्यांचे आरोग्य आणि त्यांच्यावरील उपचार विचारपूस केली. दिलीपकुमारजी यांना उत्तम आरोग्य मिळावे अशी माझी इच्छा आहे.’ अशा आशयाचे ट्वीट त्यांनी यावेळी केले आहे.

दरम्यान, यापुर्वी मे महिन्यातही दिलीप कुमार यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी नियमीत वैद्यकीय तपासणी आणि काही चाचण्या करण्यासाठी त्यांना रुग्णालयात आणल्याचे सायरा बानु यांनी सांगितले होते. दिलीप कुमार हे बॉलिवुडचे पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जातात.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!