मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणचा मुद्दा चर्चेत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यापासून पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. न्यायालयाच्या निकालामुळे मराठा समाजात मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि इतर प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.
शिवराज्याभिषेक दिनी मराठा आरक्षणासाठी पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करणार असल्याचं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसर येत्या १६ तारखेला कोल्हापुरातून मराठा मोर्चा सुरु होणार असल्याची घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे. दरम्यान, संभाजीराजेंवर काही नेते टीका करत असल्याचं दिसून येतंय. भाजपचेच खासदार नारायण राणे यांच्यापाठोपाठ शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी देखील संभाजीराजेंवर खोचक टीका केली आहे.
यावरून मराठा समन्वयकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आज संभाजीराजे यांच्यासह काही सकल मराठा समाज समन्वयकांची बैठक पार पडली. यानंतर झालेल्या चर्चिविषयी त्यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली आहे. यावेळी, ‘संभाजीराजेंवरील टीका खपवून घेतली जाणार नाही. ते श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती घराण्याचे वंशज आहेत. त्यामुळे मराठा असो वा कोणीही असो, संभाजीराजेंवरील टीका सहन करणार नाही,’ असा थेट इशारा सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पवारांना निवडणुकीचे डोहाळे लागलेत, ते तिघे एकत्र आले तरी भाजपच जिंकणार’
- ‘मराठा आरक्षणावरून महाविकास आघाडीकडे समन्वयाचा अभाव’
- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं, अहवालातून धक्कादाय माहिती आली समोर
- अजितदादा शांत झोपा…आम्हाला सरकार पाडण्यात काडीमात्र रस नाही – संजय काकडे
- कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करा – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

