मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण आधीच तापलेलं आहे. त्यात आता आणखी वाढ झाली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं मुंबई आणि महाराष्ट्रासंदर्भात केलेलं वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आलं आहे. कोश्यारी म्हणाले कि, महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढल्यानंतर मुंबई, ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही. ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, अस वादग्रसत्त वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेध करत अनेक प्रतिक्रिया येत आहेत मात्र भाजप नेते नितेश राणे यांनी मात्र राज्यपालांच्या विधानाचं समर्थन केलं आहे.
राज्यपालांच्या विधानावर नितेश राणे प्रतिक्रिया देत म्हणाले कि, “राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानामुळे मराठी माणसाचा अपमान झाला असं मला अजिबातही वाटत नाही. मी स्वतः कार्यक्रमाला उपस्थित होतो. त्यांनी फक्त मुंबईला आर्थिकदृष्ट्या बळकट बनवण्यामध्ये ज्या लोकांचं, ज्या समाजाचं योगदान आहे त्याची आठवण करून दिली. त्यामुळे कुणाचाही अपमान झाला नाही.” पुढे बोलताना त्यांनी शिवसेना आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली. “जे लोकं बोलत आहेत कि, राज्यपालांनी मराठी माणसाचा अपमान केला त्यांनी कि, जेव्हा शिवसेना प्रमुखांना मॉल बांधायचा होता तेव्हा त्यांना बरोबर चंपक जैन आठवतात. त्यांच्या मुलाला जेव्हा (आदित्य ठाकरे) जेव्हा कोविडचे कंत्राट द्यायचे होते तेव्हाही गुजराती समाजातील कंत्राटदार आठवतो. ठाकरे पैसे ठेवण्यासाठी ते नंदकिशोर चतुर्वेदीकडे जातात. महापालिकेचे कंत्राट द्यायला अग्रवाल आणि शहाच आठवत. मग तेव्हा त्यांना मराठी माणूस आठवत नाही का?”, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
मनसे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया
संदीप देशपांडे यांनी मुंबई कोश्यारींच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. ज्या गोष्टीची माहिती नाही, महाराष्ट्राचा इतिहास माहिती नाही, त्यावर बोलू नये, नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसण्याची गरज नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र किंबहुना मुंबईच्या प्रगतीमध्ये मराठी माणसाचा हात आहे, इथे बाकी लोक आले, त्यांनी स्वतःची प्रगती केली, त्यामुळे महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या प्रगतीत त्यांचा हात नाही, असेलच तर त्यांच्या प्रगतीत महाराष्ट्र किंवा मुंबईचा हात आहे, असंही ते म्हणाले.
काय म्हणाले राज्यपाल?
ज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे अंधेरी पश्चिम येथील एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, मुंबईत बाहेरून आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. काम धंदा, व्यवसाय करण्यासाठी तसेच नाव कमावण्यासाठी अनेक जण स्वप्नाची नगरी मुंबईमध्ये येतात आणि मुंबईत आपली स्वप्नं पूर्ण करतात, म्हणूनच मुंबईला स्वप्नांचं शहर म्हटलं जातं. मात्र राज्यपालांनी यावेळी बोलताना, कधी कधी मी इथल्या लोकांना बोलतो महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही, असं थेट विधान केलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut । थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा आहे ?, संजय राऊतांचा राज्यपालांना संतप्त सवाल
- MNS । गुण्यागोविंदाने इथे राहावं, नको त्या गोष्टीत शहाणपणा करु नये; मनसेची राज्यपालांना वार्निंग
- NCP । महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा; राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
- Bhagat Singh Koshyari | ‘गुजराती, राजस्थानी गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही’, राज्यपाल कोश्यारींचं वादग्रस्त विधान
- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या राज्य संपर्क प्रमुखपदी सागरराज बोदगिरे यांची निवड


