Share

नाशिकची घटना अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक आहे, सखोल चौकशी व्हावी – मुंडे

Published On: 

बीड – नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक घटना घडली आहे. ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वाहिनीच्या वॉल लिकेज झाल्यामुळे त्याठिकाणी ऑक्सिजनची गळती सुरू झाली. ही गळती सुरू झाल्याने ज्या वाहिन्यांनी रुग्णांना ऑक्सिजन पुरवले जात होते. त्या वाहिन्यांचा दबाव कमी झाल्याने 22 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

या घटनेनंतर मयत रुग्णाचे नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या आवारात एकच गर्दी करत आक्रोश केला. नातेवाईकच्या या आक्रोशाने उपस्थिताचे मन हेलावले तर हॉस्पिटलचा परिसर सुन्न झाला होता. एकूणच या दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात नातेवाईकनी संताप व्यक्त करतानाच घटनेची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित केला. तसेच दोषींवर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरून गेला असून विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात झालेली ऑक्सिजन गळतीची घटना अतिशय दुर्दैवी आणि ह्रदयद्रावक असून याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली आहे.

या दुर्घटनेत २२ रुग्ण दगावले आहेत. कोरोना सारख्या संकटात अशी घटना मनाला वेदना देणारी, अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक आहे. या घटनेची सखोल चौकशी करावी व उर्वरित रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!