Share

राज्यात ऑक्सिजनची कमतरता,ऑक्सिजनचा साठा स्पेशल विमानाने आणा

Published On: 

नाशिक : नाशिक मधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या पाईप लाईनला बुधवारी (दि. २१) साडेबारा वाजेच्या सुमारास गळती लागली होती. यामुळे सुमारे दीड ते दोन तास रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे १२० हुन अधिक गंभीर रुग्ण हे व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन वर अवलंबून होते.

ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने २२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असून अक्षरशः श्वास घेता न आल्याने त्यांचा तडफडून मृत्यू झाला आहे. या कोरोना बाधित रुग्णांच्या मदतीला नातेवाईक धावून जात त्यांच्या छातीवर दाब टाकून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, ऑक्सिजन अभावी रुग्णांनी प्राण सोडला. हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे व गंभीर असल्याने देशाच्या पंतप्रधानांपासून ते इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी देखील संवेदना व्यक्त केल्या आहेत.

या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी काही वेळापूर्वी राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर रुग्णालयात आले होते. यावेळी ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी त्यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. ‘नाशिकमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे एकूण २४ जणांचा मृत्यू झाला आहे. हा सरकारच सपशेल फोलपणा आहे. आम्ही मागील अनेक दिवसांपासून सांगतोय की आरोग्य यंत्रणा सक्षम करा. ही संपूर्ण जबाबदारी सरकारची आहे. सरकारला हात जोडून विनंती आहे की त्यांनी आतातरी जागं व्हावं. नालासोपाऱ्यात ९ जण ऑक्सिजनअभावी गेले. ठाण्यात २६ लोकांना शिफ्ट करावं लागलं. बोरेवलीला ४६ जणांना शिफ्ट करावं लागलं, असं दरेकर म्हणाले.

तसेच सरकारने ऑक्सिजनचा साठा युद्धपातळीवर उपलब्ध करुन द्यावा.ऑक्सिजनचा साठा स्पेशल विमानाने आणावा. रेमडेसिव्हीरच्या बाबतीत राजकीय अभिनिवेश बाळगता साठा उपलब्ध करुन द्यावा. असे सुद्दा प्रविण दरेकर म्हणाले.

दरम्यान, या घटनेनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. ‘मन खिन्न आहे.. उद्विन्ग आहे.. आणि हतबल ही आहे.. जगण्याची आशा असणाऱ्या त्या निष्पापांची काय चूक? हतबल यंत्रणा मृतांचे आकडे मोजते चूक नेमकी कोणाची? हे चार-दोन दिवसांनी लोक विसरूनही जातील पण रक्ताचं नातं गमावलेल्यांसाठी या यंत्रणेकडे शेवटपर्यंत तरी उत्तर असेल??’ असा उद्विग्न सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!