🕒 1 min read
मुंबई : मलाड पूर्वमध्ये भाजपा दिंडोशी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधतांना भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिवाळीनंतर ३ मंत्री आणि ३ जावयांचे फटाके फोडणार असल्याचा इशारा दिला आहे.
यासंदर्भात बोलतांना सोमय्या म्हणाले की, ‘सध्या दिवाळी सण येतोय, दिवाळीत फटाके फोडतात. मात्र, किरीट सोमय्या दिवाळीनंतर फटाके फोडणार आहे. एक, दोन, तीन, चार किंवा पाच नाही तर पूर्ण अर्धा डझन लोकांचे फटाके फोडणार आहे. घोटाळेबाज ठाकरे-पवारांनी १२ दिवस नाटकं केली. यात ३ मंत्र्यांच्या ३ घोटाळ्यांचा आणि त्यांच्या ३ जावयांचा समावेश आहे. ठाकरे सरकारमध्ये जावयांचं राज्य आहे. अजित पवार यांनी त्यांच्या जावयाला खूश केलं. हसन मुश्रीफांनी त्यांच्या जावयाला आणि नवाब मलिकांनी त्यांच्या जावयाला खूश केलं. एकदम बॉम्ब फोडण्याचं काम किरीट सोमय्या करणार आहे. यांनी केवळ लवंगी फटाके फोडले.’
दरम्यान, राज्यात विविध मुद्द्यांवरून गौप्यस्फोटांचे सत्र सुरु असतांनाच किरीट सोमय्या यांनी दिलेल्या इशाऱ्यावरून पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे आता दिवाळीनंतर सोमय्या कोणता गौप्यस्फोट करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एमआयएम महाराष्ट्रातील सर्व निवडणुका लढणार’, असदुद्दीन ओवेसींची घोषणा
- पंतप्रधान मोदी आणि पोप फ्रान्सिस भेटीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
- शरद पवारांबद्दल अपशब्द वापरल्याने तुषार भोसलेंविरोधात सहा तक्रारी दाखल
- ‘परमबीर सिंह बेल्जियममध्ये कसे गेले?’ संजय निरुपमांचा सवाल
- चंद्रकांत पाटलांचे खिसे एवढे मोठे नाहीत, ज्यांनी त्यांनी आपली मर्यादा ठेवून बोलायला पाहिजे- धनंजय मुंडे


