🕒 1 min read
मुंबई: आयपीएल २०२२ (IPL 2022) चा ६१ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात कोलकाताने हैदराबाद वर ५४ धावांनी विजय मिळवला. कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
कोलकाताचा डाव
प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने हैदराबादला १७८ धावांचे लक्ष दिले. कोलकाताची सुरुवात खराब झाली. व्यंकटेश अय्यर ७ धावांवर लवकरच बाद झाल्याने अजिंक्य रहाणे आणि नितेश राणा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अजिंक्य रहाणे ने २८ तर नितीश राणाने २६ धावांची खेळी खेळली. कर्णधार श्रेयस अय्यरलाही काही खास कामगिरी करता आली नाही, तो १५ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या रिंकू सिंगने खेळाचे सावध सुरुवात केली मात्र तो ५ धावांवर पायचीत झाला. त्यानंतर सॅम बिलिंग आणि आंद्रे रसेल यांनी संयमी खेळी दाखवत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. सॅम बिलिंग ने ३४ तर आंद्रे रसेलने ४९ धावांची खेळी केली. हैदराबाद कडून उमरान मलिकने सर्वाधिक ३ गडी बाद केले तर भुवनेश्वर कुमार, मार्को जेन्सन आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
Keep believing! ????#AmiKKR #KKRvSRH #IPL2022 pic.twitter.com/2zwxGC9HR4
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 14, 2022
हैदराबादचा डाव
कोलकाता ने दिलेल्या १७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादने डावाची सावध सुरुवात केली. हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन (९) आणि राहुल त्रिपाठी (९) झटपट बाद झाले. सलामीला आलेल्या अभिषेक शर्माने ४३ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या एडन मार्करमने ३२ धावांची खेळी खेळली. यानंतर हैदराबादच्या कोणत्याही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकता आले नाही. निकोलस पूरन (२), वॉशिंग्टन सुंदर (४), शशांक सिंग (११), मार्क जेन्सन (१) असे फलंदाज बाद होत गेले. हैदराबाद २० षटकात १२३ धावाच बनवता आल्या. कोलकाता कडून गोलंदाजी करताना आंद्रे रसेलने सर्वाधिक ३ गडी बाद केले. टीम साऊदीने २ गडी बाद केले. तर उमेश यादव. सुनील नरेन आणि वरून चक्रवर्ती यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. हैदराबादने हा सामना ५४ धावांनी गमावला.
KKR win by 54 runs. #KKRvSRH #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL
— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 14, 2022
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
