Share

‘लोकउपयोगी कामे केली म्हणून गुन्हा माफ होत नाही’ ; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवेनेचे नेते व आमदार प्रताप सरनाईक मागच्या काही दिवसांपासून आर्थिक गैरव्यवहारामध्ये अडचणीत आले आहेत. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सक्तवसुली संचलनालय आणि सीबीआयच्या रडारवर ते असल्याचे पाहायला देखील मिळाले आहे. परंतु आज एका कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने मीरा रोड येथे हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचा प्लांट सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. यावेळी ते बोलत होते. जे कोणी प्रताप सरनाईकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी प्रताप यांच्या लोकोपयोगी कामाशी स्पर्धा करून दाखवावी, असं आव्हानच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिले असल्याचे यावेळी पाहायला मिळाले आहे.

यावर आता भाजपचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे. आज ते दिल्ली येथील आयोजित पत्रकार परिषेदेत बोलताना म्हणाले कि, ‘लोकउपयोगी काम करणाऱ्यांना गुन्हा करण्याची परवानगी नसते. कोर्टामध्ये गुन्हेगाराला शिक्षा देताना त्याने किती लोकउपयोगी कामे केली आहेत याची विचारणा होत नाही. आणि त्याने लोकउपयोगी कामे केली म्हणून त्याने केलेल्या गुन्ह्यातून त्याची सुटका देखील होत नाही.’ अशी प्रतिक्रिया त्यांनी यावर दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!