Share

प्रवाशांना दिलासा! नांदेड-श्रीगंगानगर एक्स्प्रेस पुन्हा धावणार

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेक रेल्वे बंद करण्यात आल्या होत्या. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने विविध रेल्वे सुरु होत आहेत. नांदेड ते श्रीगंगानगर विशेष गाडी १२ ऑगस्ट पासून धावणार आहे. ही द्वी-साप्ताहिक एक्स्प्रेस आहे. नांदेड येथून दर सोमवारी आणि गुरुवारी सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी ती सुटणार आहे. पूर्णा-हिंगोली-वाशीम-अकोला मार्गे श्रीगंगानगर येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी पोहोचेल.

श्री गंगानगर ते नांदेड विशेष गाडी १० ऑगस्टपासून धावणार आहे. ही द्वी-साप्ताहिक एक्स्प्रेस आहे.  हि गाडी श्रीगंगानगर येथून दर मंगळवारी आणि शनिवारी सुटेल. हि गाडी श्रीगंगानगर येथून दुपारी २ वाजून ३० मिनिटाने सुटून भटिंडा, जाखल, नवी दिल्ली, आग्रा, खांडवा, अकोला, वाशीम, हिंगोली, पूर्णा मार्गे हुजूर साहिब नांदेड येथे रात्री ९ वाजून ४० मिनिटाने पोहोचेल. प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करतांना भारत सरकार आणि राज्य सरकार यांनी कोरोनाबाबत वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.

मनमाड ते मुंबई धावणारी राज्य राणी एक्सप्रेस देखील नांदेडपर्यंत वाढविण्यात आली आहे. याआधी मनमाड, नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी दहा डब्बे राखीव ठेवण्यात आले होते. यामुळे नांदेड ते मुंबई धावणाऱ्या राज्य राणी एक्सप्रेसमधील दहा रेल्वे कोच नांदेड ते मनमाड दरम्यान बंद ठेवले होते. एकुण १७ डब्यांच्या या रेल्वेमधील दहा डब्बे कायम बंद असल्याने मराठवाड्यातील प्रवाशांना सात डब्यांची रेल्वे उपलब्ध झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!