Share

संत-महंतांच्या भूमीत या सरकारने संस्कृती आणि परंपरेचा सत्यानाश केलाय – चंद्रकांत पाटील

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्ली दौऱ्यातून परतल्यानंतर मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी भेटीगाठींबाबत भाष्य करण्यासह त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर देखील हल्लाबोल केला आहे. संत-महंतांच्या भूमीत या सरकारने संस्कृती आणि परंपरेचा सत्यानाश केलाय असं म्हणत मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडलेल्या धक्कादायक प्रकारावरून महाविकास आघाडीला लक्ष्य केलं आहे.

‘निर्बंधांमध्ये सूट देताना मंदिरे, शाळा बंद ठेवून कमाईचे कारण देत महाविकास आघाडी सरकारने दारूची दुकाने सुरु केली. संत-महंतांच्या भूमीत या सरकारने संस्कृती आणि परंपरेचा सत्यानाश केलाय. सरकारच कोरोना काळात दारूची दुकाने आणि होम डिलिव्हरी सुरु ठेवत असेल तर दारू मंत्रालयातही पोहोचणारच ना,’ असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

पुढे ते म्हणाले, ‘हे प्रकरण अत्यंत गंभीर असून स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीवर लक्ष ठेवले पाहिजे. डोळे झाकून चौकशी केली जाईल. कोणी आंदोलन करतंय का हे बघतील, नाहीतर प्रकरण गुंडाळून टाकतील. त्यामुळे आम्हाला त्यासाठी आंदोलन करावे लागेल म्हणजे चौकशी नीट होईल.’ असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ?

राज्याचा कारभार जिथून चालवला जातो, त्या मंत्रालयात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मंत्रालयातील उपहारगृह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे. मंत्रालयात राजपात्रित अधिकाऱ्यांच्या उपहारगृहाच्या खालील बाजूस हे एक रुम आहे. तिथे हे धक्कादायक चित्र आढळून आले.

या दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्या कशा? हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्याचं कारणही महत्वाचं आहे. संपूर्ण राज्याचा कारभार या मंत्रालयातून पाहिला जातो. जर सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेश करायचा असेल तर येथील सुरक्षा यंत्रणांचा सामना करावा लागतो. त्यांची चौकशी केली जाते. पण मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणा भेदून या दारुच्या बाटल्या आत आल्याच कशा? असा प्रश्न सध्या सर्वच स्तरांतून व्यक्त केला जात आहे. आधीच चंद्रपुरातील दारू बंदी उठवल्याने महाविकास आघाडी सरकारवर नाराजी व्यक्त करण्यात येत होती. आता या प्रकरणामुळे सरकारच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!