🕒 1 min read
मुंबई : सीरम इस्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला होता. त्यांनी म्हटलं होतं की, मला धमक्या दिल्या जातायत आणि सत्य बोललो तर माझे शीर कापले जाईल, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली आहे. आपल्या देशातील श्रीमंत आणि मोठ्या मोठ्या राजकीय हस्थींकडून त्यांना या धमक्या येत आहेत, त्यांच्या या दाव्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती. या धमक्यांमुळेच अदर पुनावाला हा देश सोडून लंडन ला गेले आहेत.
दरम्यान, यानंतर उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलं होतं. तरी राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील रंगले होते. आता राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. सीरमकडून महाराष्ट्राला दीड कोटी लस मिळणार होत्या. मात्र केंद्राने त्यांना धमक्या दिल्यामुळे ते लंडनला जाऊन बसले आहेत, असं खळबळजनक विधान मुश्रीफ यांनी केलंय.
‘मुख्यमंत्र्यांनी सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांच्याशी चर्चा केली त्यावेळी जूनपासून दीड कोटी लसी द्यायचं त्यांनी ठरवलं होतं. परंतु, त्यांना केंद्राकडून धमक्या देण्यात आल्या. त्यानंतर ते लंडनला जाऊन बसलेले आहेत. केंद्र सरकारने धमकी दिल्यामुळे त्या लशी राज्याला मिळाल्या नाही. एकीकडे राज्य सरकारला डोस द्यायला सांगायचे आणि दुसरीकडे बाजूला धमक्या देण्याचा प्रकार घडला आहे,’ असं भाष्य हसन मुश्रीफ यांनी केलं होतं.
उच्च न्यायालय काय म्हणाले होते ?
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या अदर पुनावाला यांनी देशासाठी सध्याचा काळात खूप भरीव योगदान दिलंय. संपूर्ण देशासह जगासाठी एक संजीवनी ठरणारी ‘कोविशिल्ड’ ही लस त्यांच्या कंपनीनं तयार केली. त्यामुळे अशा व्यक्तीला जर धमक्या येत असतील तर ते फार गंभीर प्रकरण आहे. याची तातडीनं दखल घ्यायला हवी, असं मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ब्लू टीक’ पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे लक्ष द्या: मलिकांनी फटकारले
- ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री तरला जोशी यांचे निधन
- बाहेर लोकांना उपदेश करणाऱ्या बुवाने केली पत्नीला मारहाण; सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल
- ‘सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन जनतेने केल्याने कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येतेय’
- संतापजनक : समाजकंटक पर्यटकांनी केली तोरणा किल्ल्याच्या बुरुजाची नासधूस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
