Share

फडणवीस, खडसे यांच्यानंतर आता रामदास आठवले घेणार शरद पवारांची भेट

Published On: 

मुंबई : काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली होती. यानंतर, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे देखील पवारांच्या भेटीला गेले होते. यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले होते.

आता रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले लवकरच शरद पवार यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटत असताना काही दिवसांपूर्वी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला होता. पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे भरताना 33 टक्के जागा आरक्षित ठेवण्याचे निर्बंध उठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यामुळे विरोधकांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं होतं. तर, काँग्रेसने देखील नाराजी व्यक्त केली होती.

आता पदोन्नतीमधील मागासवर्गीयांचे आरक्षण आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून आठवले हे पवारांची भेट घेणार आहेत. पदोन्नतीमधील अरक्षणाचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने त्वरित घ्यावा अन्यथा रिपब्लिकन पक्ष राज्यात अधिक तीव्र आंदोलन छेडेल. त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ती राज्य सरकार ची जाबाबदारी असेल. यापुढे दलित आदिवासी मागासवर्गीयांच्या हक्काची अडवणूक करू नका त्यांच्या संयमाचा अंत पाहू नका असा गंभीर इशारा देखील आठवले यांनी दिला आहे.

पदोन्नतीमधील आरक्षणासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे दि. 1 जून ते 7 जून आंदोलन सप्ताह राज्यभर पाळण्यात आला. आज आंदोलन सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी राज्यभर रिपब्लिकन पक्षातर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले. आंदोलन सप्ताहाचा समारोप मुंबईत बोरिवली तहसील कार्यलयावर रिपाइं मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, आयोजक जिल्हा अध्यक्ष हरीहर यादव यांच्या नेतृत्वात आंदोलन करून करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!